This day, eight years ago:
In pursuit of my vision as the Metropolitan Commissioner to transform the PMRDA region into an international tourist destination—one that fosters large-scale employment and elevates the incomes of our rural communities—I embarked on extensive journeys across the most promising locales within Pune district in 2015-16. It was on this very day, eight years ago, that I set forth on an excursion, traversing the rugged terrain of the illustrious Torna Fort, a site imbued with the grandeur of history. This fort, the first formidable conquest of the legendary King Chhatrapati Shivaji Maharaj, stands as an enduring symbol of his epic rise to greatness.
Yet Torna is not merely a relic of historical significance. It is also a veritable sanctuary of biodiversity, its natural majesty fully revealed in the post-monsoon flourish. The monsoon rains, having receded, leave behind a landscape bursting with verdant life, a tableau of nature’s exuberance. Among the countless marvels to be found here is the rare Karvy, known scientifically as Strobilanthes callosus, a wildflower of deep purplish-blue hues that blooms but once every seven years. On this fateful day, the ridges leading to the fort were awash in this floral wonder—a sight so extraordinary that it could only be described as a gift to the beholder’s eyes.
The Sahyadri, or the Western Ghats, holds within its ancient folds not just the stories of valor and empire, but also the marvels of flora and the intricacies of geological formations, each a testament to the eternal artistry of nature. To witness the Karvy in its bloom, set against the dramatic contours of the mountains, was to glimpse the miraculous—nature in her most resplendent and untamed form. Truly, these Western Ghats stand as miracles unto themselves, a testament to both life and time.
याच दिवशी, आठ वर्षांपूर्वी:
पोस्ट-मॉन्सूनमधील सह्याद्रीचे वैभव!
मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागातील उत्पन्न वाढविण्यासाठी, महानगर आयुक्त म्हणून पीएमआरडीए क्षेत्राला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या माझ्या संकल्पनेतून, पुणे जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण स्थानांचा शोध घेण्यासाठी मी २०१५-१६ मध्ये अनेक दौरे करायचो. त्याचाच एक भाग म्हणून याच दिवशी, आठ वर्षांपूर्वी, मी दिवसभर पदयात्रा करत महाराजांच्या ऐतिहासिक तोरणा किल्ला आणि परिसराची माझ्या सहकाऱ्यांसमवेत पाहणी केली. तोरणा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाची मुहूर्तमेढ —त्यांच्या महापराक्रमाच्या उदयाचे प्रतीक!
पण तोरणा हा केवळ ऐतिहासिक स्थळ म्हणूनच नाही तर जैवविविधतेचा संपन्न ठेवा आहे, आणि विशेषतः मॉन्सूननंतर निसर्गाच्या अद्वितीय सौंदर्यात त्याचे खरे सौंदर्य उलगडते. मॉन्सून संपल्यानंतर, इथला भूभाग हिरव्या रंगाच्या छटांनी न्हालेला असतो, जणू निसर्गाचा उत्सव सुरू असतो. या परिसरातील अनेक अद्भुत वनस्पतींपैकी एक म्हणजे ‘कारवी’, ज्याला शास्त्रीय भाषेत Strobilanthes callosus म्हणतात. ही निळसर-जांभळी जंगली फुलं सात वर्षांत एकदाच फुलतात, आणि त्या दिवशी तोरणाच्या माथ्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही फुलं उधळलेली होती. डोळ्यांसाठी हा एक दुर्मिळ आनंद होता!
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये केवळ इतिहासाच्या गौरवशाली आठवणीच नाहीत, तर निसर्गाच्या अद्वितीय वनस्पतींची आणि भूगर्भातील विविधतेची अद्भुत रुपे साठवलेली आहेत. कारवीच्या अशा विलक्षण बहराचे दर्शन घेणे आणि त्या महान पर्वतराजाच्या अंगाखांद्यावरून फुललेले निसर्गाचे चमत्कार पाहणे हे निसर्गाच्या अद्वितीय कलाकृतीचे दर्शन घेण्यासारखे होते. खरंच, या सह्याद्री पर्वतरांगा म्हणजे एक चमत्कारच आहेत, काल आणि निसर्गाच्या सामर्थ्याचे प्रतिक!
दुर्दैवाने, अकाली बदली झाल्याने आणि माझ्या नंतर आलेल्या अधिकाऱ्यांना या संकल्पनेकडे दुर्लक्ष केल्याने पीएमआरडीए क्षेत्राला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न प्रत्यक्षात साकार होवू शकले नाहीत.
-Mahesh Zagade, IAS(rtd)