#MaxMaharashtra चिरीमिरीच्या आमिषापोटी औषध प्रशासन हे नागरिकांच्या आयुष्याशी खेळतंय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पंजाबच्या ड्रग्ज अधिकारी नेहा सुरींच्या हत्येनंतर औषध व्यवसायातील अवैध गोष्टी पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर आल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी अन्न व औषध प्रशासन आयुक्त महेश झगडे यांनी औषध व्यवसायातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केलंय.