Lord Hewart: Aphorism

In 1924, Lord Hewart, Chief Justice of England, famously stated that “Justice should not only be done, but also seen to be done.” This phrase has since become one of the fundamental principles of justice systems around the world, emphasizing the importance of transparency and fairness in legal proceedings. However, as we approach the 99th anniversary of Lord Hewart’s quote, it is worth considering whether this principle is still sufficient in our modern era.

In 2023, my take on this quote is that “Justice should not only be seen to be done, but should actually be done”.While transparency and fairness are crucial components of any justice system, they are not enough on their own. Justice must also be swift, accessible, effective and more importantly uninfluenced by any external factors in order to truly serve the needs of society.

One of the biggest challenges facing justice systems today is the issue of accessibility. Many people are unable to access legal services due to financial, social, or cultural barriers. This creates a significant gap in the ability of justice systems to serve all members of society equally. To address this issue, many countries are exploring new approaches to legal aid, such as offering free or low-cost legal services to those who need them.

Another major challenge facing justice systems is the issue of speed. Legal proceedings can often drag on for years or even decades, causing immense frustration and stress for those involved. This is particularly true for criminal cases, where delays can result in prolonged detention or even wrongful convictions. To address this issue, many countries are exploring new approaches to case management, such as using technology to streamline the legal process and reduce delays.

One more emerging issue is that there is growing concerns about the independence of the judiciary in many countries across the world. There have also been allegations that the judiciary has been used as a tool by the governments to suppress dissent and opposition voices.

The justice systems, therefore, must also be effective in order to truly serve the needs of society. This means that they must be able to deliver just outcomes in a timely and consistent manner. It also means that they must be able to adapt to changing social, economic, and technological conditions in order to remain relevant and effective over time.

In conclusion, the principle that “Justice should not only be seen to be done, but should actually be done” represents an evolution of Lord Hewart’s original quote, reflecting the changing needs andexpectations of society over the past 99 years. While transparency and fairness remain important components of any justice system, they must be accompanied by accessibility, speed, effectiveness and remain

uninfluenced by any external pressures in order to truly serve the needs of all members of society. As we continue to evolve our justice systems to meet these challenges, we can ensure that justice is not just a concept, but a reality of all. Justice is of paramount importance for any society as otherwise, if injustice delivered in the garb of justice paves way for necrosis of democracy.

Standard

भारत लोकशाहीची जननी आहे का?

भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखले जाते आणि लोकशाही पद्धतींचा मोठा आणि समृद्ध इतिहास आहे. भारताचा लोकशाही प्रवास 1947 मध्ये सुरू झाला जेव्हा देशाला ब्रिटीश औपनिवेशिक( Colonial)राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेल्या भारतीय संविधानाने निवडून आलेले सरकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि सर्व नागरिकांना हमी दिलेले मूलभूत अधिकार असलेली लोकशाही शासन व्यवस्था स्थापन केली.

भारताच्या लोकशाहीने भ्रष्टाचार, सांप्रदायिकता आणि प्रादेशिकता यासह अनेक आव्हानांचा सामना केला आहे, परंतु ती भक्कम राहिली आहे आणि ती सतत विकसित होत आहे. भारतात 1951 पासून नियमित आणि शांततापूर्ण निवडणुका झाल्या आहेत, ज्यामध्ये देशभरातील लाखो नागरिकांचा सहभाग आहे.

भारताची लोकशाही ओळख मजबूत असली तरी भारताला “लोकशाहीची जननी” म्हणणे योग्य ठरणार नाही. संपूर्ण इतिहासात लोकशाहीची संकल्पना विविध स्वरूपात अस्तित्वात आहे आणि भारताच्या लोकशाही प्रणालीवर युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि स्वित्झर्लंड सारख्या इतर लोकशाहींचा प्रभाव आहे. तथापि, भारताच्या अनोख्या इतिहासाने, संस्कृतीने आणि राजकीय वातावरणाने त्याच्या लोकशाही प्रणालीला आकार दिला आहे आणि लोकशाहीचे एक वेगळे मॉडेल बनवले आहे ज्याने जगभरातील इतर देशांना प्रेरणा दिली आहे.

(प्राचीन ग्रीक लोकांना “लोकशाहीचे जनक” म्हणून श्रेय दिले जाते, कारण ते 500 ईसापूर्व अथेन्स शहर-राज्यात लोकशाही शासन प्रणाली विकसित करणारे पहिले होते. “लोकशाही” हा शब्द ग्रीक शब्द “डेमो” वरून आला आहे, ज्याचा अर्थ “लोक” आणि “क्राटोस,” म्हणजे “शासन” किंवा “सत्ता” असा होतो.

तेव्हापासून, अनेक देशांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारल्या आहेत, प्रत्येकाचा स्वतःचा अनोखा इतिहास आणि राजकीय संस्कृती. तथापि, कोणत्याही एका देशाला “लोकशाहीची जननी” म्हणणे योग्य ठरणार नाही कारण लोकशाहीची संकल्पना विकसित झाली आहे आणि कालांतराने विविध संस्कृती आणि ऐतिहासिक घटनांनी प्रभावित झाली आहे.)

Standard

Is India a Mother of Democracy?

India is often regarded as the world’s largest democracy and has a long and rich history of democratic practices. India’s democratic journey began in 1947 when the country gained independence from British colonial rule. The Indian Constitution, which came into effect on January 26, 1950, established a democratic system of governance with an elected government, an independent judiciary, and fundamental rights guaranteed to all citizens.

India’s democracy has faced numerous challenges, including corruption, communalism, and regionalism, but it has remained resilient and continues to evolve. India has held regular and peaceful elections since 1951, with the participation of millions of citizens across the country.

While India’s democratic credentials are strong, it would not be accurate to call India the “mother of democracy.” The concept of democracy has existed in various forms throughout history, and India’s democratic system has been influenced by other democracies such as the United States, the United Kingdom, and Switzerland. However, India’s unique history, culture, and political environment have shaped its democratic system and made it a distinct model of democracy that has inspired other countries in the region and around the world.

(The ancient Greeks are often credited with being the “fathers of democracy,” as they were the first to develop a democratic system of government in the city-state of Athens around 500 BCE. The word “democracy” comes from the Greek words “demos,” meaning “people,” and “kratos,” meaning “rule” or “power.”

Since then, many countries have adopted democratic systems of government, each with their own unique histories and political cultures. However, it would not be accurate to call any one country the “mother of democracy,” as the concept of democracy has evolved and been influenced by various cultures and historical events over time.)

Standard

“स्वातंत्र्याची ७५ वर्षे- शेतीविकास पण शेतकऱ्यांची अधोगती”महेश झगडे, आय ए एस(नि)माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन.मानवाचा इतिहास हा जीवसृष्टीच्या एकूण इतिहासाच्या तुलनेत अत्यल्पावधीचा आहे. जीवसृष्टीचा इतिहास हा 380 कोटी वर्षांचा असून माणूस प्राणी हा केवळ 25-30 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आला आणि लाखो वर्षे कंदमुळे, मेलेली जनावरे गोळा करून किंवा नंतर जनावरांची शिकार करून त्याने जीवन व्यतीत केले. तथापि, माणसाचा खरा इतिहास हा केवळ बारा ते पंधरा हजार वर्षांचा असून त्यास कारणीभूत शेती व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू होण्यापूर्वी माणूस अन्नाच्या शोधात कायम भटकंती करीत होता. या भटकंतीचा कंटाळा येऊन एका महिलेने- होय महिलेने पुरुषाने नव्हे, एके ठिकाणी वास्तव्य करून पीक घेण्याचा निर्णय घेतला व शेतीचा उगम झाला, असा शास्त्रज्ञानाचा तर्क आहे. वास्तविक, दोन पायांवर उभे राहून चालणे, बोलीभाषा तयार होणे, अग्नीचा नियंत्रित वापर करणे, दगडांचा साधने म्हणून वापरास सुरुवात हे जसे मानवाच्या इतिहासात टर्निंग पॉइंट आहेत, तसेच शेतीची सुरुवातदेखील एक अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असून, ती खरे तर पहिली औद्योगिक क्रांती होय. तथापि, प्रचलित वैचारिकतेनुसार पहिली औद्योगिक क्रांती सन 1776 मध्ये जेम्स वॉटसन यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला तेव्हापासून सुरू झाली आणि तेव्हापासूनच शेतीचे दहा-बारा हजार वर्षे राहिलेले प्राबल्य कमी होत गेले. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास जगात जी काही प्रगती आपण पाहतो त्याचे श्रेय १०-१२ हजार वर्षांपासून ते सन १७५० पर्यंत प्रामुख्याने शेतीने जे उत्पन्न दिले तोच सर्व विकासाचा प्रमुख पाया राहिला. अर्थात १७५० नंतर झालेल्या तीन औद्योगिक क्रांतींमुळे शेतीचे स्थान जागतिक आणि देशांच्या पातळीवर आर्थिक ताकदीच्या स्वरूपात कनिष्ठ दर्जाकडे जाण्याची वाटचाल सुरू होऊन द्वितीय, तृतीय म्हणजेच कारखानदारी आणि सेवा क्षेत्राच्या तुलनेत शेती पहिल्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली . पण एक गोष्ट कदापिही नजरेआड करून चालणार नाही ती म्हणजे सन 1750 पूर्वी जे काही या पृथ्वीतलावर भौतिक आणि अन्य जे काही भव्यदिव्य घडले त्याच्या मुळाशी उन्हातान्हात, पावसाळ्यात, हिवाळ्यात रात्रंदिवस कार्यरत राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे कष्ट आहेत. भारताच्या दृष्टीने ही बाब तर अतिशय महत्त्वाची होय. सन 1700 पूर्वी भारतातील शेती, त्यापासून उपलब्ध होणारा कच्चा माल आणि त्यावर आधारित उद्योग, शेतीवर आधारित मसाले उत्पादने किंवा कपड्यांची निर्यात इत्यादीमुळे भारताचे सकल उत्पादन संपूर्ण जगाच्या एकचतुर्थांशच्या दरम्यान होते व तो जगातील सर्वांत मोठी आर्थिक महासत्ता होता. आता आपण जे जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहत आहोत, त्याऐवजी अडीचशे वर्षांपूर्वी जसे आपण आर्थिक महासत्ता होतो तसेच पुन्हा जागतिक आर्थिक महासत्ता होऊ या असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरले. केवळ हेच नाही तर शेतीवर आधारित तंत्रज्ञानाची निर्यातदेखील त्या वेळी भारतातून झाली. उसापासून साखरनिर्मिती करण्याचे तंत्रज्ञान चीनने भारताकडून घेतले त्याचे हे एक उदाहरण. दुर्दैवाने गेल्या अडीचशे वर्षांत शेती व्यवसाय हा कमी शिकलेले किंवा कमी प्रगत असलेल्या लोकांचा व्यवसाय आहे, असे त्याचे स्वरूप झाले. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षात शेतीचा विकास झाला की अधोगती झाली, यावर विवेचन करताना स्वातंत्र्यपूर्वी आणि तिन्ही औद्योगिक क्रांतींपूर्वी शेतीचा दैदीप्यमान इतिहास नजरेआड करणे या कष्टकऱ्यांशी प्रतारणा ठरेल. शेतीमुळे भारत जागतिक आर्थिक महासत्ता होता हे सत्य लपविता येणार नाही व आजच्या कारखानदारी व माहिती तंत्रज्ञानाच्या पिढ्यांना त्याची जाणीव यासाठी करून द्यावी लागेल, की जे भारतीय शेतकऱ्यांना जमले तसे त्यांना अद्याप जमलेले नाही. इंग्रज राजवटीत कापूस वगैरे पिकांचा तसेच अल्प प्रमाणात धरणे-पाटबंधारे इत्यादीची सुरुवात झाली असली, तरी त्या शासनकर्त्यांचे भारतीय शेती पिकवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते असा निष्कर्ष काढला तर वावगे ठरणार नाही. त्याची परिणिती म्हणजे 1891 ते 1946 म्हणजे सुमारे 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये शेतीचा विकासवृद्धीचा दर केवळ 0.8 आठ टक्के इतका अत्यल्प राहिला व शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत गेली. सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळेस भारताची लोकसंख्या 34 कोटी होती आणि अन्नधान्याचे उत्पादन पाच कोटी टन इतके होते ते 2021 मध्ये 31.5 कोटी टन म्हणजे गेल्या 75 वर्षांत ते सहा पटीपेक्षा जास्त वाढले आहे आणि लोकसंख्या चार पटीने वाढली आहे. गेल्या 75 वर्षात लोकसंख्येची वाढ 411% तर अन्नधान्य उत्पादनातील वाढ 630 % पेक्षा जास्त झाली हे वास्तव आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे अन्नधान्य उत्पादनाचे वास्तव यासाठी समजून घेणे आवश्यक आहे, की ब्रिटिश राजवटीत भारतात झालेल्या अन्नधान्याच्या टंचाईमुळे लाखो लोक अन्नावाचून भुकेमुळे मृत्यू पडत होते. विशेषतः 1865- 67 मधील ओरिसा दुष्काळामुळे 50 लाख, 1876-77 मधील दक्षिण भारतातील दुष्काळामुळे 60 लाख ते एक कोटी, सन 1896-97 संपूर्ण भारतातील दुष्काळामुळे 1.2 ते 1.6 कोटी आणि सर्वांत शेवटचा 1943 मधील ग्रेट बंगाल दुष्काळामुळे 20 ते 30 लाख असे इतर दुष्काळामुळे 1865 ते 1943च्या या 80 वर्षांच्या कालावधीत सुमारे 4.8 कोटी लोक भुकेमुळे मृत्यू पावले. भुकेमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होणे ही ब्रिटिश राजवटीत सर्वांत मोठी काळिमा लागणारी बाब होती. स्वातंत्र्यानंतर हे चित्र पूर्ण बदलले. नंतर दुष्काळ येत राहिले, पण दुष्काळामुळे भूकबळी ही बाब इतिहासजमा झाली आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतीय शेतीची ही सर्वांत मोठी यशस्विता आहे, हे सूर्यप्रकाशाइतके प्रखर आहे. सर्व पिके व विशेषतः नगदी पिकांचे उत्पादन व उत्पादकता स्वातंत्र्यानंतर वाढली. ही गौरवास्पद बाब असून, अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होऊन काही प्रमाणात निर्यातक्षम झाला, हे नेत्रदीपक यश मानावे लागेल. अर्थात, त्याची तुलना इतर शेती प्रगत राष्ट्रांबरोबर होणे शक्य नसले तरी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची तुलना ही महत्त्वाची ठरते. एकंदरीतच स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना भारतीय शेती, शेतकरी आणि एकूणच अर्थव्यवस्थेची परिस्थिती एका शब्दांत वर्णन करावयाचे झाल्यास ती अत्यंत दयनीय होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारमध्ये व विशेष करून केंद्र सरकारमध्ये स्वातंत्र्य चळवळीतील मुशीतून तयार झालेले प्रगल्भ नेतृत्व शीर्षस्थानावर असल्याने देशाच्या प्रगतीचा पाया भक्कम आधारावर घालण्यात आला आणि त्यामध्ये शेती क्षेत्राचा प्रामुख्याने अंतर्भाव होता. यात सर्वात महत्वाचे म्हणजे पंचवार्षिक योजना या प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीचा परिणाम होता. देशाची भविष्यकालीन विकासाच्या वाटचालीची रूपरेषा या पंचवार्षिक योजनांमधून आखून काटेकोरपणे राबविण्याचा तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. पंचवार्षिक योजना राबविण्यासाठी 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि त्याचे पहिले चेअरमन पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी 1951 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली. या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे बोधवाक्य हेच मुळात "कृषी विकास" हे होते व यावरून शेती क्षेत्राकडे गंभीरतेने लक्ष देऊन विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचा पाया घालण्यात आला हे दृष्टीआड करून चालणार नाही. पुढे देशात जी हरितक्रांती झाली किंवा देश अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण झाला, त्याचे बरेचसे श्रेय हे एक सुरुवात म्हणून या पहिल्या पंचवार्षिक योजनेस आणि वैयक्तिकरीत्या पंडित नेहरूंना जाते. पहिल्या पंचवार्षिक योजनेत एकूण नियतव्यय रुपये 2069 कोटी (नंतर 2378 कोटी) रुपयांपैकी जलसिंचन व ऊर्जा कृषिविकास भूमिहीन शेतकऱ्यांचे पुनर्वसन या कृषी क्षेत्राशी निगडित कार्यक्रमाकरिता एकूण 48.7% म्हणजेच जवळजवळ निम्मा निधी विकासाकरिता उपलब्ध करून दिला होता. यावरून देशात कृषी क्षेत्राचा विकास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तत्कालीन नेतृत्वाचा होता, हे सुस्पष्ट आहे आणि त्यानंतर राबविण्यात आलेल्या सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये तो पुढील पुढे चालू राहिला. पंचवार्षिक योजनेबरोबरच 1967 मध्ये अधिक धान्य पिकवा हा कार्यक्रम, 1949 मध्ये उच्च उत्पादकता असलेल्या सीओ 740 या उसाच्या वाणाची निर्मिती, 1951 मध्ये फोर्ड फाउंडेशनने देशातील कृषी संशोधनासाठी 1.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा भारत सरकारबरोबर केलेला सामांजस्य करार, 1952 मध्ये कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सीडीपी म्हणजे सामूहिक विकास कार्यक्रमाची सुरुवात, जगातील पहिल्या गव्हावरील तांबेरा रोगास प्रतिकार करणाऱ्या एनपी-809 या गव्हाच्या जातीचा विकास, १९६० मध्ये पंतनगर येथून पहिल्या राज्य कृषी विद्यापीठाची स्थापना करून ती सर्वच राज्यांमध्ये नेण्याची सुरुवात, 1966 मध्ये सीएचएस-1 या भरघोस पीक देणाऱ्या ज्वारीच्या वाणाचा विकास, 1966 मध्ये शेतमालाला आधारभूत किंमत (एमएसपी)ची सुरुवात, तसेच याच वर्षी उच्च उत्पादन पिकांचे वाण विकसित करण्याच्या योजनेचा आरंभ, 1982 मध्ये नाबार्डची स्थापना व त्याच वर्षी गव्हाची एचडी-2329 या भरघोस उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जातीचा विकास, 1984मध्ये राष्ट्रीय बागवानी बोर्डाची स्थापना अशा अगणित कार्यक्रमांद्वारे शेतीविकासाचे कार्यक्रम देशात राबविण्यात आले. भारतातील हवामान, जमीन किंवा मातीची प्रत, मान्सूनचा लहरीपणा, लोकसंख्येमुळे जमिनीचे झालेले अल्प तुकडे अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या 75 वर्षांतील शेतीविकासाची वाटचाल नेत्रदीपक म्हणावी लागेल. हे झाले शेती विकासाबाबत, पण शेतकऱ्यांचा विकास झाला का, हा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. वास्तविकतः शेतीविकास झाला म्हणजे ज्याच्या कष्टावर शेती अवलंबून आहे त्या शेतकऱ्याचा विकास होऊन त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी येणे स्वाभाविक होते पण दुर्दैवाने तसे झाले नाही. शेतीविकास आणि शेतकऱ्यांचा विकास या एकमेकांवर अवलंबून असलेल्या बाबी असल्या तरी त्या पूर्णपणे भिन्न राहिल्या. स्वातंत्र्यानंतर शेतीने देशाला काय दिले किंवा गेल्या 75 वर्षांत शेतीची गती झाली की अधोगती झाली, याचे निर्विवादपणे उत्तर राहिले की, गत 75 वर्षांत शेतीची भरघोस प्रगती होऊन देशाला भरपूर दिले आहे. तथापि ही झाली नाण्याची एक बाजू. शेतीचा विकास आणि त्यायोगे अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भरता होणे किंवा नगदी व अन्य पिकांच्या माध्यमातून निर्यात वाढली जाणे हे जरी शक्य झाले असले तरी शेतकऱ्यांची अवस्था गेल्या 75 वर्षांत बिकट झाली आहे, हे देखील नाकारून चालणार नाही. अर्थात माझ्या या मतास काहींचा कडाडून विरोध राहील व त्यांच्या समाधानासाठी मी असे म्हणेन की “शेतीची ज्या प्रमाणात प्रगती झाली, त्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढली नाही” आणि हे त्यांनाही नाकारता येणार नाही. कारखानदारी किंवा दुय्यम क्षेत्र आणि सेवा किंवा तृतीय क्षेत्रातील आर्थिक वृद्धी झाली त्याच प्रमाणात कृषी किंवा प्राथमिक क्षेत्राची पीछेहाट होऊन शेतमालाला मिळणारा मोबदला हा सकल उत्पादनात संकुचित होत गेला. हरकत नाही, कारण या दोन क्षेत्रामधून रोजगार निर्मिती झाली असली तरी पण त्यासापेक्ष शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण संकुचित होत गेले नाही व शेती क्षेत्रातील दरडोई उत्पादकाचे प्रमाण कमी होऊन शेतकऱ्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हालाखीचीच राहिली. आकडेवारीतच सांगायचे झाले तर सन 1950-51 मध्ये देशाचे सकल उत्पादन जीडीपी रु. 2,93,900 कोटी होते आणि त्यामध्ये प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती इ चा हिस्सा रुपये 1,50,200 कोटी किंवा 51.10 टक्के म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त होता. तसेच शेतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अवलंबून असलेली लोकसंख्या 70% पेक्षा जास्त होती. दुसऱ्या शब्दांत स्पष्ट करायचे म्हणजे देशातील 70 टक्के लोकसंख्या 50% पेक्षा जास्त सकल उत्पादनाला जबाबदार होती. आता अलीकडील अहवालानुसार शेती आणि संबधित क्षेत्रावर २०११च्या जनगणनेनुसार अद्यापही देशातील 54 ते 55 टक्के लोकसंख्या अवलंबून असून, या क्षेत्रामधून केवळ 17-18% सकल उत्पादनास (जीडीपी) जबाबदार आहेत. याचाच अर्थ 75 वर्षांचा याबाबतचा आढावा घ्यायचा झाला तर या कालावधीत केवळ पंधरा टक्के लोकसंख्या शेतीकडून कारखानदारी आणि सेवा क्षेत्रात सामावली गेली. पण सकल उत्पादन 51 टक्के वरून 17 टक्के वर आले म्हणजे ते 34% ने कमी झाले. याचा अर्थ म्हणजे शेतीवरचे अवलंबित्व कमी होण्यासाठी त्या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण कमी होऊन ते सतरा-अठरा टक्के इतके खाली आणले गेले पाहिजे होते तसे झाले नाही हि वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. औद्योगिक क्रांतिपर्व 1776 नंतर सुरू झाल्यानंतर अनेक देशात कारखानदारी व सेवा क्षेत्रात रोजगार उपलब्ध झाल्याने विकसित राष्ट्रातील शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या या दोन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सामावून घेण्यात आली. उदाहरण द्यायचे झाले तर अमेरिका या आर्थिक महासत्तेची आता फक्त एक टक्का लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून त्या प्रमाणातच म्हणजे एक टक्का सकल उत्पादन शेती क्षेत्रापासून मिळते. तशीच परिस्थिती थोड्याफार फरकाने बहुतांश विकसित देशांची आहे. एकंदरीतच पहिल्या तीन औद्योगिक क्रांतींमध्ये विकसित देशांनी शेती अवलंबून असलेल्या लोकांना कारखानदारी व सेवा क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून सामावून घेतले आहे. अर्थात, हे शक्य होण्याचे कारण म्हणजे प्रत्येक औद्योगिक क्रांतीदरम्यान कारखानदारी व सेवा क्षेत्रात प्रचंड रोजगार निर्माण झाला. भारताच्या बाबतीत पहिल्या दोन औद्योगिक क्रांतीदरम्यान देश पारतंत्र्यात असल्याने औद्योगीकरणाचा म्हणावा तसा फायदा झाला नाही आणि परिणामतः शेतीवर अवलंबून असलेल्या जनतेला कारखानदारी व सेवा क्षेत्रात विकसित देशांच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात सामावून घेण्याच्या संधी उपलब्ध झाल्याने शेतीवरचे अवलंबित्व कायम राहिले. देशातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्षेत्रातील सकल उत्पादनातील जो हिस्सा किंवा टक्केवारी आहे त्या टक्केवारीतच त्यावर अवलंबून असणाऱ्या जनतेचे प्रमाण आवश्यक आहे. तथापि, सध्याची तशी परिस्थिती नसल्याने शेतीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवलंबून असणाऱ्या जनतेचे उत्पन्न अल्प असून त्यांची कारखानदारी व सेवा क्षेत्राच्या तुलनेत आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यांचे दुष्परिणाम म्हणजे अल्प दरडोई उत्पन्न, उत्पन्नाची खात्री नसणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्पन्नाचे दर ठरवून उत्पादन खर्च व नफा मिळून किफायतीशीरपणे शेती करण्याचे स्वातंत्र्य नसणे. यावरून "शेती विकास झाला, पण शेतकरी विकासापासून वंचित राहिला आहे", हे सत्य सर्वाना निर्विवादपणे स्वीकारणे अपरिहार्य आहे. जशी शेतीची प्रगती करण्यासाठी केंद्र सरकारने धोरणे आखली व ती यशस्वी केली तशी धोरणे शेतकऱ्यांची प्रगती करण्याची अभावानेच आखली गेली. अल्प दराने कर्ज, कधीतरी कर्ज माफ करणे, पीककर्ज विम्याचा खेळखंडोबा अशी विकलांग धोरणे तयार करून “शेतकऱ्यांचा विकासासाठी काही करतो आहोत”, या अविर्भावापलीकडे कोणत्याही पक्षाने काही खास धोरणे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात राबविलेली दिसून येत नाही. अर्थात त्यामध्ये सबसिडी वगैरेचा खेळ मांडला, पण तो देखील तसा या वर्गाची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी “काहीतरी” केले या सदरात मोडण्यासारखेच राहिले. परिणामतः शेतकऱ्यांच्या आत्महत्यासारखा विषय देशात निर्माण झाला. दुर्दैवाने शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता, देशापुढील रोजगारांची समस्या हा विषय देशाच्या एकूणच सर्वंकष धोरणाचा प्रमुख हिस्सा गणण्याऐवजी त्याकडे शासनाकडून तशी सर्वंकष भूमिका कधीही घेतली नाही. वास्तविकतः देशाचे विकासाचे धोरण एका मूळ भरभक्कम पायावर उभे करणे आवश्यक आहे. हा निर्णय देशाने घेतला पाहिजे. त्यातील “महत्त्वाचे तत्त्व हे असावे की, प्रथम (शेती व तत्सम) द्वितीय (कारखानदारी), तृतीय (सेवा) क्षेत्रातून ज्या टक्क्यात सकल उत्पन्न जीडीपी निर्माण त्या टक्केवारीतच त्या क्षेत्रातील लोकसंख्येचे अवलंबित्व ठेवणे”. अर्थात वास्तवित: हे विकसित देशाप्रमाणे यापूर्वीच होणे आवश्यक होते, कारण आता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये ते आता अत्यंत जिकिरीचे होणार असून विकसित देशांनी त्यासाठी जे काही केले त्यापेक्षा वेगळा मार्ग चोखळावा लागेल. तो काय हे समजून घेणे महत्त्वाचे. जसे की अगोदर नमूद केले आहे त्यानुसार विकसित देशांनी शेतीवर शेतीवर अवलंबून असलेल्या जनतेस विकसित देशांप्रमाणे कारखानदारी व सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले भारतासही तशी संधी होती, पण ते झाले नाही व आता चौथ्या औद्योगिक क्रांतिपर्वात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), कॉग्निटिव्ह ॲन्यालिसिस, थ्रीडी प्रिंटिंग, रोबोटिक्स, अल्गोरिदमिक तंत्रावर आधारित प्रणाली इत्यादीमुळे व लोकशाही किंवा शासनव्यवस्था तंत्रशहाच्या हातातील बाहुले बनल्यामुळे कारखानदारी व सेवा क्षेत्रातील रोजगारांच्या संधी संकुचित होत जातील. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या भारतीय लोकसंख्येला विकसित देशांसारखे कारखानदारी व सेवा क्षेत्रात सामावून घेण्याचे दरवाजे बंद होत चालले आहेत. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या 50 -55% लोकसंख्येला शेती व्यवसायातून कारखानदारी व सेवा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे प्रमाण 17% पर्यंत म्हणजे कृषी क्षेत्रापासून मिळणाऱ्या सकल उत्पन्न जीडीपी या सापेक्ष करणे आता अशक्यप्राय झालेले आहे ही वस्तुस्थिती राजकीय व प्रशासकीय नेतृत्व, अर्थशास्त्रज्ञ इत्यादींनी ते समजून घेऊन त्यावर पर्याय काढणे अत्यावश्यक झाले आहे. याबाबतीत एक उपाय मी दोन वर्षांपूर्वी सुचविला होता व तो म्हणजे शेती व्यवसायातील सकल उत्पादनाचे सुदृढीकरण करून शेतीवर अवलंबून असलेल्या 50-55% लोकसंख्येचे दरडोई उत्पन्न हे कारखानदारी व सेवा क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांच्या दरडोई उत्पादनाच्या पातळीवर आणणे. त्याकरता आता उपलब्ध झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत कारखानदारी किंवा सेवा क्षेत्रातिल उत्पादनाच्या किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य जसे उत्पादकांना आहे, तसेच स्वातंत्र्य किंवा वैधानिक प्रणाली उपलब्ध करून शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाची विक्री किंमत ठरवण्याची सक्षमता आणणे. तसेही एकूण अर्थव्यवस्थेमधील शेती उत्पादने वगळता सुमारे 80% उत्पादने किंवा सेवा यांच्या किमती ठरवण्याचे अधिकार उत्पादकांनाच आहेतच तसेच अधिकार अर्थव्यवस्थेतील सुमारे 20% शेती उत्पादनास देण्यास कोणतीही अडचण असूच शकत नाही. हे करण्यासाठी शासनाने विकसित केलेला व वैधानिक अधिष्ठान असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करून “प्रथम खरेदी न्यूनतम किंमत” किंवा “फर्स्ट ट्रेड मिनिमम प्राईस” ( First Trade Minimum Price- FTMP) ही मी यापूर्वीच सुचवलेली एक संकल्पना किंवा त्यापेक्षाही चांगल्या संकल्पना राबवून शेतीप्रमाणेच शेतकऱ्यांचाहि विकास होऊ शकतो. यामध्ये आणखीन एक मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेतजमिनीची मालकी केवळ गुंतवणूक किंवा जमीन खरेदी-विक्रीतून नफेखोरीची जी प्रकरणे वाढीस लागली आहेत व ज्यामुळे शेतकरी देशोधडीस लागून ते शहरातील झोपडपट्ट्यांकडे स्थलांतरित होतात त्यावरही बंधन आणणे आवश्यक आहे. अर्थात हा विषय हि तितकाच गंभीर असून त्याकडेही सर्व शासनकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनीही लक्षात घेतला पाहिजे. या बाबाबतीत मी नाशिक जिल्हाधिकारी म्हणून जे शेतजमिनी धनदांडग्यांनी लाटण्याचे कुभांड रचले होते त्यास शासनकर्त्यांनीही दुर्दैवाने धनदांडग्यांना पाठिंबा दिला होता ते हि शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे आणि शेतीचे अवैध हस्तांतरण थांबविण्यासाठी मोहीम घेतली पाहिजे. महेश झगडे, आय ए एस(नि) माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन.

Standard

My vision regarding Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) (Departing letter to colleagues after my abrupt transfer in2017)

Pune-411007

Dated: 3rd May, 2017

Dear Colleagues,

In 2015, it was a typical mid May scorching summer , a season I equally adore with winter and monsoon, when I joined the Pune Metropolitan Region Development Authority as its first full fledged employee, fifteen days after creation of the Authority. It’s the same scorching summer of May, when I have handed over the charge to my successor after a less than two years of an eventful tenure in 2017.

I am leaving this young organization, which was not just designed by me but also shaped it into the futuristic 21st century governmental start-up and innovation laboratory for administrative processes, market behavior, dynamic economic models, turbo urbanization for livable cities with highest happiness index, premier international investment destination to function as growth engine for the country, employment led growth with lowest energy intensity per capita, virtual office eco-system for beyond one window systems with zero delays, less governance and minimum expenditure on the organization with an endeavor for ultimate transparency. This was to showcase the country and the world how governmental organizations can function in an internet savvy age and gear up to assimilate cognitive analytics into everyday functioning, rather than mere continuance as extension of fifteenth and sixteenth century office environment. Of course, it was a challenge to break away from the traditional overpowering views about governance from powerful stakeholders, within and without. However, together we could make definite headway in a very subtle yet in a robust manner.

It was a twin challenge to create and shape this organization as well as to implement the mandate assigned to us and with your round the clock support, we could cover substantial ground in a short span of less than two years despite usual overt and mainly covert impediments and hindrances.

To recapitulate the tasks, may I refresh your memories for the sake of taking these forward, if you consider it appropriate to do so…

1. We have, except a few tasks, converted office processes as paperless. Our next ongoing endeavor was to create virtual office and to make need of physical office and building premises eventually redundant, paving way for minimum human interventions from our side, making PMRDA services available 24X7X365 days by eliminating formal office timings, no holidays, no need for stakeholders to travel to our office premises. We have made sufficient budgetary provisions for this and had also Intellectual engagements with experts to develop virtual office by assimilating emerging technologies of big data analytics, block-chain and especially the cognitive systems similar to IBM Watson software. This would lead to ultimate solution for ease of doing business and provision of services to citizens in a most transparent manner and heavy reduction of bureaucratic apparatus with permanent saving in public expenditure.

2. As a definitive and concrete step towards development of processes for highest level of Ease of Doing Business, we have combined preparation of Existing Land Use exercise with creation of land parcels database with an accuracy of less than 10 cms along with all the natural and anthropological attributes/parameters including accurate coordinates, contour mapping; data pertaining to rainfall, radiation, wind velocity, roads, railways, surface and ground water information, land titles and every other attribute that is ever needed by a citizen or a businessman. We were about to complete the most powerful and very comprehensive, first of its kind Geo-portal in the country. You may consider to launch it in a few weeks time so that the stakeholders can get benefits of it, all across the world.

3. Mumbai-Pune axis is one of the fifty urban agglomerations on the planet around which most of the world population is slated to get congregated. We have, therefore, conceptualized most modernized 21st century cities with highest livability index and sustainable economic activities by identifying sectors for job and wealth creation. This was to be achieved through planning tools for which we have already issued tender inviting agencies to take up Town Planning Schemes by adopting disruptive innovations. This topic is a humongous and we have finalized all aspects of it to create future ready cities, which you only need to execute now.

4. The Existing Land Use Plan is almost ready and , therefore, you need to publish intention for preparation of Development Plan as per vision that we have created during last two years.

5. We were to create most modern, intelligent and futuristic ring-road Economic Corridor on the outskirts of Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporations, especially with a vision to make it accident-free and environmental friendly tourist destination. The DPR needs to be finalized immediately so that the project implementation can happen in next three years as decided.

6. The Hinjewadi-Shivajinagar metro route conceptualization, preparation of DPR and invitation of tender were completed in an unprecedented shortest possible time-frame and procurement of fifty acres of land for metro depot was taken up to advanced stage. We were planning to implement this project with unprecedented speed to commence its commercial operations within two and half years. You need to just keep pace of the implementation.

7. The massive project of Indrayanikathi encompassing 18 kms stretch of Indrayani river between Lonawala and Kamshet has been taken to advanced stage. As you are aware that this largest river development project is being developed as an international tourist destination, an alternative to some of the popular world class happening places.

8. Water is going to be most scarce resource in coming years and therefore, we have prepared water account which is placed before a sub-committee for vetting it. This will have to be taken to logical conclusion by making a holistic plan for entire PMR so that it could be utilized for about 2.5 crores of population and economic activity.

9. The PMR is blessed with very interesting river network system, however, the same is facing serious threats from ever increasing pollution. The project for river improvement taken up by us needs to be completed within a short time frame before the situation gets out of hand.

10. We have also designed modalities for giving boost to economic activity by identifying sectors of economy through disruptive innovations of which you are well aware. I implore all of you to give highest priority to this as any urbanization without wealth or job creation would be a creation of sterile habitations leading to more problems than solutions.

11. We have invested a lot of time in creating right atmosphere for the development of intensive and high value Agri-horti-floriculture sector for international market. We have decided about the model also. Please try to implement the same.

12. We had three successful meetings with the team of Hyperloop as exploratory exercise to understand whether this nascent transportation system could be implemented in PMR and between Pune and Mumbai. As you are aware that the project could become feasible and if implemented it would take about just 11 minutes travel time between these two cities. You may continue the dialogue with Mr Bebop of the Hyperloop.

13. The innovative organizational set up for water supply is almost on the verge of its launch. You should facilitate approval of water sourcing from the Water Resources Department.

We had embarked on a very massive exercise with very clear vision and objectives to make PMR as an international premier investment destination and the points mentioned above are just indicative short list of what we were implementing. You may enumerate all other projects for making PMR as a successful urbanization model of 21st century.

I considered my posting, as the first employee of the organization, as a kind gesture by Hon Chief Minister , who had reposed confidence in me and provided us with vision and robust support to take forward his vision to an advanced level . All of you worked in unison for advancing his mandate.

I am well aware that, in governmental set up where traditional administration is considered to be the norm and out of box thinking is not always welcomed , you supported my non-traditional ways and disruptive methodologies, albeit with an occasional resentment. Let me put on record my appreciation for your hard work and team spirit. We faced many challenges from traditionalists, however, you stood by me for whatever progress that we have made. I don’t recollect any shortcomings except that we did not take our initiatives in public domain and you all are aware of the reason for the same.

I wish all of you a grand success in professional and personal lives.

With best wishes…..

( Mahesh Zagade )

Ex- Metropolitan Commissioner & CEO,

Standard

RTI…the Tool.

In India, where we live, breathe and thrive,

There’s a right that we must all strive,

To attain information, it’s a noble cause,

It’s the cornerstone of democracy, its rightful clause.

The Right to Information Act, a beacon of hope,

For the masses, a way to help them cope,

With the complexities of government and its ways,

And to hold those in power accountable for their deeds and ways.

With just a few clicks, or a simple pen,

We can seek what’s hidden and reveal it again,

No more secrets, no more lies,

We have the power to pierce through their disguise.

It’s a tool of change, a voice for the people,

A way to make their opinions heard and revel,

In a transparent system, where truth prevails,

And the right to information never fails.

So let us use this right, with care and pride,

For a better India, where freedom abides,

Where knowledge is power and ignorance a curse,

And the right to information, our greatest resource

………………………………….. Mahesh Zagade

Standard

Post-Retirement Appointments.

It is a well established practice that officers of the All India Services as well as senior officials of the State Services and judges are appointed after retirement to various Tribunals, Statutory Commissions/Boards/Authorities or for that matter to any entity created under the Constitution or statutes including the posts of Governors of the states. This is generally done with a view to making use of these retired officials by accessing their immense knowledge base, matured experience and vision for the larger public good.

As the bureaucratic and judicial apparatuses are extremely important for the robustness of democracy, the sanctity of these administrative and judicial tools needs to be maintained in an impeccable manner by making it politically neutral. This aspect becomes even more important in an environment of overpowering culture of strong political parties , intensely vying with each other to maintain their supremacy through a culture of no holds barred to capture power.

In this context, the officials looking forward to get appointed to the post-retirement assignments mentioned above may become vulnerable to the political machinations of the party in power and lose neutrality in decision making or toe the line of the government even if the decisions are not tenable under the Constitution or the Statutes or not good for the people. It’s seen, barring some exceptions, the officials close to the political leadership tend to attract preference for such post-retirement assignments, notwithstanding the competencies or suitability. This is denting the robustness of the democratic ecosystem.

On this background, in my opinion, this practice of appointment of the above mentioned retired officials be stopped forthwith and healthier practice of appointing them during their final five years of service be established. The officials can be give option of opting for such post-retirement assignments at the age of 55 years with a condition that they will have to exit the service once they join the assignment. The government can think of making provisions for additional posts by increasing the cadre strengths on the lines of the Central Deputation reserves.

Such a system would ensure the neutrality of the administrative and judicial machineries as well their experience and knowledge could be utilized for the posts mentioned earlier.

This aspect needs wider discussion.

Standard

लोकशाही ‘लोकांची’ होण्यासाठी…..

………..महेश झगडे

लोकांनी , लोकांसाठी,चालवलेले लोकांचे राज्य ही लोकशाहीची व्याख्या बदलत जाऊन ती मूठभरांची व्यवस्था होऊ पाहते आहे. या बदलापासून देशाला वाचवणे म्हणजेच पर्यायाने जगाला वाचवणे …ते कसे शक्य आहे ?

महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्ष हा 2019 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यापासून जो सुरू झाला आहे तो सहा महिन्यापूर्व विकोपाला गेलं आणि आता सर्वोच्च न्यायालय व राजकीय आखाड्याच्या कक्षेत असून अद्याप तो थांबलेला नाही. सध्याचे वातावरण बघता तो काही थांबेल याचे भाकीत करणे ही अशक्य झाले आहे. अर्थात, या सर्व घडामोडींमध्ये राज्याचे प्रश्न, त्या प्रश्नांची सोडवणूक, बेरोजगारी, महागाई, सामाजिक तणाव, शेतकऱ्यांचे गंभीर बनत चाललेले प्रश्न, कायदा व सुव्यवस्था अशा अगणित प्रश्नांचे निश्चित काय होत असेल, याकडे ज्यांच्यावर लोकशाही व्यवस्थेतून जबाबदारी सोपवलेली आहे त्यांचे लक्ष केंद्रित असणे असे अभिप्रेत करणे सुद्धा भाबडेपणाचे आहे. अर्थात, हा सत्तासंघर्ष किंवा लोकशाहीतील खेळखंडोबा हा महाराष्ट्रामध्ये प्रथमच होतो असे नाही. यापूर्वी महाराष्ट्रासहित देशातील अन्य राज्ये आणि केंद्रशासनात देखील असे निवडणुकीनंतरचे राजकीय द्वंद्व आणि सत्तांतरण व शासनातील खेळखंडोबा अनेक वेळेस दिसून आलेला आहे. सत्तांतरण हा शब्द जरी यासाठी वापरला जात असला तरी खरे म्हणजे लोकशाहीत ‘सत्ता’ हा शब्द तसा अनाठायी आहे. पण लोकशाहीची अवस्था अशी करून ठेवली आहे की ‘लोक’शाही हे अंतिम ‘साध्य’ साधण्यासाठी नव्हे तर सत्ता मिळविण्याचे ते एक साधन बनलेले गेले आहे. हे इतके बेमालूमपणे झाले आहे की, ते जनतेने ग्राह्य धरले आहे. त्यामुळे नाइलाजाने का होईना सत्तासंघर्ष हा शब्द लोकशाही प्रथम २५२९ वर्षांपूर्वी सुरू झाल्यानंतर आजही वापरावा लागत आहे हे लोकशाहीचे जे विद्रुप करण्यात आले आहे त्याचा परिपाक होय.

वास्तविकतः कालपरत्वे वैयक्तिक स्वार्थ आणि काही अंशी विचारधारांचा अतिरेकी प्रभाव या दोन प्रमुख बाबींमुळे लोकशाही क्षीण होत चालली आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. वैयक्तिक स्वार्थ हा प्रामुख्याने अर्थार्जनाच्या वाटेने जाणारा असल्याने जागतिक पातळीपासून गाव पातळीपर्यंत लोकशाही संस्था या भांडवलशाहीच्या बटिक बनत चालल्या आहेत. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते जोसेफ स्टिग्लीट्झ यांनी सध्याच्या लोकशाहीची व्याख्या ही म्हणजेच द्रव्याच्या अंकित जाऊन लोकांची, लोकांकडून व लोकांकरिताची शासनव्यवस्था याऐवजी १% लोकांची , १% लोकांकडून आणि १% लोकांकरिता असलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही अशी सुधारित केली आहे. त्यामध्ये १% हे जगातील सर्वांत धनवान असलेला लोकांचा समूह अभिप्रेत आहे.

सन २०१८ मध्ये राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीतील धन, बहुबलता व प्रसारमाध्यमे यांचा गैरवापर कसा थांबवता किंवा कमी करता येईल, याकरता एक कार्यशाळा मुंबई विद्यापीठांमध्ये घेतली होती व त्यामध्ये मी सहभागी झालो होतो. सर्वच वक्ते अत्यंत पोटतिडकीने हा निवडणुकीतील वरील बाबींचा गैरव्यवहार कसा कमी करता येईल, यावर आपापले अभ्यासपूर्ण विचार मांडीत होते. अर्थात, त्याचे मला मनोमन हसू येत होते. कारण एखाद्याचे शरीर कर्करोगाने जर्जर झाले असेल तर त्याला बरे व्हावयासाठी वरवरचे उपचार पुरे पडत नाहीत तर हा रोग कायमस्वरूपी कसा बरा होऊ शकतो त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर जालीम उपाययोजनाच करावी लागते. निवडणुकांमध्ये उमेदवार किंवा राजकीय पक्ष पैसा का खर्च करतात, याचे गुपित दोन गोष्टींमध्ये दडलेले आहे- एक तर जगातील सर्व देशांमध्ये गेल्या 40-50 वर्षांत भांडवलशाही आणि बाजारू अर्थशास्त्राने लोकशाही संस्थांवर हळूहळू वर्चस्व वाढवून आता लोकशाहीवर भांडवलशाहीचे इतके वर्चस्व वाढले आहे की, भांडवलशाहीने लोकशाहीला गिळंकृत केले आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. त्याचबरोबर संपत्तीचे केंद्रीकरण इतके झपाट्याने होत गेले आणि आता ते विकोपाला जात असून जोसेफ स्टिग्लीट्झ  यांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ १ टक्के लोकांकडे सर्वांत जास्त संपत्ती आहे. ते जगावर सत्ता गाजवीत आहेत. दुसरे म्हणजे लोकशाहीतील लोकप्रतिनिधी यांनी समाजसेवा हे व्रत समजण्याऐवजी भांडवलशाहीच्या प्रवाहात आणि त्यांच्या कह्यात पुरेपूर आले असून, त्यामध्ये ते पूर्णपणे गुरफटले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मी त्या कार्यशाळेतील चर्चा ही बाळबोध असल्याची आणि जोपर्यंत संपूर्ण लोकशाहीला भांडवलशाहीच्या विळख्यातून बाहेर काढायचा प्रयत्न होत नाही तोपर्यंत निवडणुकांमध्ये धनसंपत्तीचा गैरवापर कमी करण्याचे प्रयत्न म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे हे स्पष्ट केले. अशा परिस्थितीत सध्याची लोकशाही पैशांची, पैशाकडून आणि पैशांकरता झालेली निवडणूक आयोगाने त्रयस्थ व स्वायत्त संस्था म्हणून देशाला नवी दिशा द्यावी असेच सुचविले. अर्थात, माझे हे विचार पचनासाठी तितकेसे सोपे नाहीत, हे मलाही माहीत आहे; पण मग त्याशिवाय दुसरा अन्य उपाय सध्या तरी क्षितिजावर दिसून येत नाही.

लोकशाहीचे आरोग्य सुदृढ करावयाचे झाले तर त्यासाठी काय केले पाहिजे, हा मुद्दा देशाच्या आणि जगाच्या अजेंड्यावर आला पाहिजे. तसा तो बऱ्यापैकी दुर्लक्षिला गेला आहे हे मान्य करावे लागेल. रोजगार वृद्धी, आर्थिक समानता, आरोग्य सुविधा, पर्यावरणाचा ऱ्हास, भरकटणारी अर्थव्यवस्था, कधीही कोसळू शकेल असा बँकिंग व्यवसायाचा हिंदोळे घेत असलेला डोलारा, आण्विक युद्धाची कायमस्वरूपाची भीती, पाणी आणि ऊर्जेचे वाढणारे दुर्भिक्ष, वाढती लोकसंख्या, किळसवाणी नागरीकरण अशा अगणित समस्या जगापुढे आ वासून उभ्या असल्या, तरी त्या सर्वांवर समर्पक तोडगे काढून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जी सक्षम व्यवस्था जागतिक, देश पातळीवर व देशांतर्गत असावी लागते ती जर कमकुवत असेल तर मग सर्वच भरकटत जाईल यात शंका नाही. प्रथम जग लोकशाही व्यवस्थेकडे गेले तरच समस्या सुटण्याचा मार्ग दिसून येतो. अन्यथा इतर व्यवस्थांमुळे निष्पत्ती काय होईल हे कोणीही सांगू शकणार नाही. उत्तर कोरिया हे एक त्याचे उदाहरण.

जर आपण लोकशाहीबाबत जगाचा मागवा घेतला तर एक बाब लक्षात येईल की’ लोकशाही दिवसेंदिवस क्षीण होण्याची प्रक्रिया आता वाढतच चालली आहे. आपण जर जागतिक लोकशाहीच्या आरोग्याचे सिंहावलोकन केले तर परिस्थिती विचलित करणारी आहे. लोकशाहीचे मूल्यमापन करणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्यापैकी व्ही-डेम इन्स्टिट्यूट यांनी जागतिक पातळीवर जगात सर्वत्र लोकशाही मूल्यांची अधोगती होत असल्याचे त्यांच्या अभ्यासावरून अधोरेखित केले आहे. त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय द इकॉनॉमिक्स या लंडनस्थित प्रथितयश नियतकालिकाच्या एक प्रभाग इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट यांनी 2006 पासून जागतिक लोकशाहीचे दरवर्षी मूल्यमापन करून लोकशाही सुदृढतेचा निर्देशांक अभ्यासपूर्ण प्रक्रियेतून जाहीर करीत आलेले आहेत. सन 2021 च्या त्यांच्या अभ्यासानुसार जगातील फक्त सहा 6.4% लोक हे पूर्ण लोकशाही व्यवस्थेत असून 39.3% लोकसंख्या दोषपूर्ण लोकशाही, तर 17.2% लोकसंख्या मिश्र लोकशाही व 37.1 लोकसंख्या ही हुकूमशाही व्यवस्थेमध्ये आजही वावरत आहे. अमेरिका व भारत हे दोषपूर्ण लोकशाही व्यवस्थेत असल्याचा त्या युनिटचा निष्कर्ष आहे. त्यांचे आणखीन एक निरीक्षण असेही आहे की, उत्तरोत्तर लोकशाही क्षीणतेकडे झुकू लागली आहे.

जगातील लोकशाही भक्कम करावयाची झाल्यास पृथ्वीवरील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताने पुढाकार घेणे आवश्यक ठरते. यापूर्वी तत्कालीन दोन महासत्तांच्या कोल्डवॉरपासून दूर राहून नॉन अलाईन्ड मोहीम चालवताना लोकशाही संकल्पनेला बळकटी देण्याच्या प्रयत्नात त्या वेळेस भारत आघाडीवर होता. आता पुन्हा त्यापेक्षा जास्त व्यापक भूमिका घेणे भारतासाठी आवश्यक आहे. अर्थात लोकशाहीची एकंदरीत घसरण थांबवण्यासाठी भारताने प्रथम स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. त्याबाबत काय करावे लागेल यावर अनेक मते-मतांतरे असू शकतील; पण मला जे वाटते ते पुढे नमूद करीत आहे. राज्यात जे सत्तांतरणाचे नाट्य सुरू आहे ते म्हणजे राज्यात शासन स्थापण्याकरिता ज्या समूहाकडे एकूण विधानसभेच्या आमदारांच्या संख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच ज्यांच्याकडे बहुमत असेल ते घटनेप्रमाणे सक्षम ठरतात. अर्थात यामध्ये ‘समूह’ हा जो शब्द वापरण्यात आला आहे तो एक पक्ष किंवा अनेक पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेला समूह किंवा संख्याबळासाठी या दोन्ही प्रकारांतील समूहांनी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्यांसहित सर्व सदस्यांचा संच असा होय. दुसऱ्या शब्दांत, पक्षांतरबंदी कायदा किंवा घटनेतील परिशिष्ट 10 मध्ये जे पक्षांतरबंदीच्या तरतुदींचा भंग केला नाही असे कोणीही सदस्यांचा संच एकत्र येऊन निम्म्यापेक्षा जास्त संख्याबळ जमू शकेल त्यांना शासन स्थापण्याची संधी प्राप्त होते. उदाहरण म्हणून महाराष्ट्राचा विचार केला तर विधानसभेचे एकूण संख्याबळ 288 असल्याने त्यांच्या निम्मे म्हणजे 144 पेक्षा जास्त संख्या ज्या समूहाकडे असेल ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात, त्याप्रमाणे राज्यात आणि देशपातळीवर त्यांच्याकडे बहुमत म्हणजे एकूण विधानसभा सदस्य किंवा लोकसभा सदस्यसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्य असतील त्यांचे शासन असते, हे घटनात्मक तरतूद म्हणून ठीक आहे. पण येथेच मग सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे सदस्यांचा किंवा पक्षाचा स्वार्थ हा सत्तास्थापनेसाठी महत्त्वाचा किंबहुना एकमेव धागा उरतो. यामध्ये लोकशाही मूल्य गौण ठरतात. या पार्श्वभूमीवर देशात लोकशाही बळकट होऊन त्याचे जगापुढे उत्तम उदाहरण ठेवायचे असेल तर काही मूलभूत बदल करणे अत्यावश्यक राहील. ते मी थोडक्यात मांडतो.

प्रथमतः लोकप्रतिनिधी निवडणे ही मतदारांची इच्छा असते, राजकीय पक्ष त्यामध्ये त्यामानाने लोकशाही मूल्यात व संविधानाच्या संरचनेप्रमाणे गौण असतो. खरे तर संविधान लागू झाल्यापासून सुरुवातीची 45 वर्षे ‘राजकीय पक्ष’ ही संकल्पना संविधानात 1985 मध्ये दहावे परिशिष्ट अंतर्भूत करण्यापर्यंत नव्हती. तथापि, राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये पायदळी तडवून ‘आयाराम गयाराम’ची संस्कृती निर्माण झाली. त्यावर दहावे परिशिष्ट रामबाण उपाय म्हणून अंतर्भूत करण्यात आले. एक चांगली सुरुवात झाली. त्याचे परिणाम चांगले दिसून आले असले तरी तो रामबाण उपाय नव्हताच, हे आता निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे. जर यावर कायमस्वरूपी तोडगा काढावयाचा असेल तर निवडणुकीत पंजीकृत पक्षाने ज्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला आहे तो उमेदवार निवडून आला तर तो त्याचा कार्यकाल संपेपर्यंत किंवा त्या पक्षाने त्याचे सदस्यत्व रद्द केले नाही तोपर्यंत तो एबी फॉर्म दिलेल्या पक्षातच असेल, अशी तरतूद संविधानात करण्यात यावी. याबाबत त्यांचे सदस्यत्व रद्द केले किंवा नाही, याचा निर्णय पक्षांतर्गत निवडणूक पद्धतीने निवडून आलेल्या पक्षप्रमुखांच्या स्वाक्षरीनेच ठरविण्याची ही तरतूद असावी. ज्या पक्षाने एबी फॉर्म दिलेला आहे त्या पक्षप्रमुखाने विधानसभाध्यक्ष किंवा लोकसभाध्यक्ष यांना कळवले की, त्या सदस्याने पक्षविरोधी भूमिका घेतली आहे ते लिखित कळविले तर त्याची पोच हीच त्या सदस्यांची सदस्यत्व रद्द होण्याची अंतिम प्रक्रिया असावी.

दुसरे म्हणजे प्रातिनिधिक लोकशाहीच्या सुदृढतेकरिता आणखी एक कलम संविधानात अंतर्भूत करणे गरजेचे आहे. विधानमंडळ किंवा संसदेत अविश्वासाचा किंवा विश्वासदर्शक प्रस्ताव काळात लोकप्रतिनिधींना त्यांची मते मांडण्याची पक्षविरहित मुभा असावी. दुसऱ्या शब्दांत व्हीप नावाचा प्रकार केवळ अविश्वास/विश्वासदर्शक प्रस्तावावरच असावा आणि अन्य बाबतींत सदस्याने पक्षविरोधी मत नोंदविले तरी ते सदस्य अपात्र ठरणार नाहीत म्हणजेच ते पक्षाचा नव्हे तर लोकभावनांचा आदर ठेवू शकतील.

तिसरी बाब म्हणजे, देशाने संपूर्ण लोकशाहीकडे वाटचाल करण्याकरिता पक्षांकडून पक्षाने निवडणुकीपूर्वी जे जाहीरनामे प्रसिद्ध होतात त्यास वैधानिक दर्जा देणे गरजेचे आहे. संविधानातील प्रकरण चारमधील निर्देशक तत्त्वाप्रमाणे देश चालावा, असे अभिप्रेत आहे. ते समोर ठेवून जाहीरनाम्याचा एक वैधानिक स्वरूप (फॉरमॅट) ठरविण्यात येऊन प्रत्येक पक्ष सेवा करण्यासाठी निवडून आला तर (सत्तेत नव्हे) काय करेल, याचा संपूर्ण लेखाजोखा व त्याची अंमलबजावणी करण्याचे, पाच वर्षांच्या मर्यादेचे वेळापत्रक देण्याचे बंधन करण्यात यावे; तसेच त्यासाठी निधीची आवश्यकता असेल तर तो कसा उभारला जाईल, यांचेही ढोबळमानाने धोरण देण्यात यावे. या जाहीरनाम्याव्यतिरिक्त मोठे धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर त्यास संसद वा विधानमंडळाचे दोनतृतीयांश बहुमत असल्याशिवाय घेण्यात येऊन नयेत, अशी तरतूद असावी. अर्थात, कोणते मोठे धोरणात्मक निर्णय आहेत हे ठरवणे अत्यंत क्लिष्ट भाग असल्याने त्यावर देशांतर्गत चर्चा होऊन यावर यथावकाश निर्णय व्हावा.

चौथी बाब म्हणजे देशातील भ्रष्टाचार निपटून काढावयाचा असेल तर लोकपाल, लाचलुचपत प्रतिबंध इत्यादी पोस्टमार्टेम अथवा घटना घडून गेल्यानंतरच्या उपाययोजनांबरोबरच मुळात भ्रष्टाचाराची जननी म्हणजे निवडणूक खर्च यावर पूर्णपणे मर्यादा आणावी. लोकशाहीच्या अनेक व्याख्यांपैकी ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी केलेली व्याख्या म्हणजे दीन दुबळे आणि जे बहुमतात आहेत अशांचे शासन, अर्थात दीन दुबळे हे नेहमीच बहुमतात असतात. पण अलीकडील निवडणुकांचे खर्च पाहिले तर लोकशाही ही केवळ मूठभर श्रीमंतांची बटीक झाली आहे व लोकशाहीचे स्वरूप हे ‘श्रीमंतशाही’कडे झुकलेले आहे. जर भारतास आणि जगास खरोखरच निकोप लोकशाही पाहिजे असेल तर जे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या क्षीण आहेत त्यांचा सहभाग हा त्यांच्या संख्येच्या सापेक्ष व्हायचा असेल तर निवडणुकांसाठी अजिबात खर्च होऊ नये, ही प्राथमिक गरज आहे. त्याच वेळेस निवडणुकादरम्यान खर्च केलेला पैसा पुन्हा राजकारणातून वसूल करणे किंवा इतर धनदांड्यांकडून देणगी स्वरूपातील मिळालेल्या मिळालेल्या पैशाच्या बदल्यात त्यांना धार्जिणे असलेले निर्णय घेण्याची बांधिलकी येणे व त्यामुळे  सर्वदूर भ्रष्टाचाराचा उगम होतो. हे सर्व टाळावयाचे असेल तर निधीचा निवडणुकीदरम्यान खर्चास मज्जाव हा एकमेव जालीम उपाय आहे.

वरील चार संविधानिक तरतुदींबरोबरच लोकशाहीमध्ये, ज्या लोकशाहीशी सुसंगत नाहीत अशा बाबी पूर्णपणे काढणे. याचा आढावा घेण्यासाठी देशभर जनमानसातून मते मागून विचार व्हावा. अशाच एका लोकशाही तत्त्वांच्या विरोधात संविधानात असलेली तरतूद म्हणजे राज्यपाल हे पद! लोकशाही ही जनतेच्या लोकप्रतिनिधीमार्फत चालवली जाते व तोच अशा शासनव्यवस्थेचा मूळ गाभा आहे. शिवाय या लोकप्रतिनिधींना सहाय्यभूत ठरेल अशी नोकरशाहीदेखील लोकशाहीला पूरक ठरावी म्हणून ती निकोप असावी असे तत्त्व अंतर्भूत असते. आपल्या संविधानाचा परामर्श घेतला तर राष्ट्रपतींपासून ग्रामपंचायत किंवा नगरपालिकांच्या संस्थांपर्यंत निवडणूक प्रक्रियेतून, मग तो प्रत्यक्षात निवडणूक असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, लोकप्रतिनिधी निवडले जातात व तीच शासनव्यवस्था होय. नोकरशाही ही लोकशाहीला पूरक असावी म्हणून शिवाय ती तटस्थ असावी यासाठी संविधानातील प्रकरण 14 नुसार नोकरशाहीचा नियुक्त्या किंवा त्यांना सेवेतून काढून टाकणे याची एक तटस्थ व राजकारणविरहित व्यवस्था निर्माण केलेली आहे व त्यानुसार संघ व राज्य लोकसेवा आयोग आणि अन्य स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची तरतूद आहे जेणेकरून नोकरशाही राजकीय दबावापलीकडे राहू शकेल.

या सर्व लोकशाही व्यवस्थेत राज्यपाल असे एक पद आहे की जे ना लोकशाही प्रक्रियेच्या निवडणुका माध्यमातून येते अथवा तटस्थ यंत्रणेकडून निवडले जाते. राज्यपालाची नियुक्ती किंवा त्या पदावरील व्यक्तीला हटवणे, ही पूर्णपणे लोकशाही विसंगत राजकीय प्रक्रिया आहे. त्यामुळे हे पद लोकशाही संकल्पनेत अजिबात अंतर्भूत होत नाही. अशा लोकशाही प्रक्रियेच्या परिघाबाहेरील पद राज्याचा प्रमुख करणे, ही बाब लोकशाहीमध्ये हास्यास्पद आहे. हे पद संविधानिक बदल करून तातडीने रद्द केले पाहिजे. अर्थात, या पदाकडे जी कर्तव्ये सोपविलेली आहेत, त्यांसाठी स्वतंत्र लोकशाही व्यवस्था अपेक्षित आहे. एक तर राज्याचे प्रमुख हे लोकशाही प्रक्रियेतून आलेले मुख्यमंत्री हेच ठरविता येतील. दुसरे म्हणजे शिक्षण क्षेत्रातील कुलगुरूंच्या नेमणुका किंवा तत्सम कामे लोकशाही प्रक्रियेतून आलेले मंत्रिमंडळ हाताळू शकेल. अन्य अत्यंत महत्त्वाची सर्व कामे मंत्रिमंडळाकडे असताना या अशा किरकोळ बाबी अनभिषिक्त अशा पदाकडे ठेवण्याचे काहीच प्रयोजन नाही. मंत्रिमंडळाला शपथ देणे यासाठी राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असू शकतात, त्यासाठी राज्यपालांची आवश्यकता नाही. अर्थात हा देश फेडरल पद्धतीने संरचित केलेला असल्याने केंद्र आणि राज्यांमध्ये दुवा ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता राज्यपालाऐवजी प्रत्येक राज्यात सध्या राज्यपालाचे सचिवालय असते ते राष्ट्रपतींचे सचिवालय म्हणून घोषित करता येऊ शकेल. यामध्ये सर्व राज्यांसाठी राष्ट्रपती हेच संविधानांतर्गत फेडरल संकल्पना मूर्त स्वरूपात राबू शकतील. तसेही राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सर्व राज्यांचे विधानसभा सदस्य हे मतदार असल्याने ते लोकशाही प्रक्रियेतून आलेले पदच महत्त्वाच्या बाबी हाताळू शकेल. राज्यातील राष्ट्रपती सचिवालय दैनंदिनरीत्या राष्ट्रपती भवनाबरोबर संपर्कात राहू शकते. अशाने राज्यांच्या बाबतीत देशात कोणताही निर्णय व्हायचा असेल तर त्यामध्ये राज्या-राज्यांत वेगवेगळ्या राज्यपालांच्या लहरीप्रमाणे न राहता एकसमान व्यवस्था निर्माण होऊन देशाचे बळकटीकरण होण्यास मदत होईल व देशात लोकशाही व्यवस्था आणखी सुदृढ होऊ शकेल. राज्यपाल किंवा राजभवनांवर जो भरमसाट खर्च होतो तोदेखील त्यामधून कमी होऊ शकेल.

एकंदरीतच देशाची लोकशाही आणि तीदेखील जगातील सर्वांत मोठी लोकशाही निकोप करावयाची असेल तर वरीलप्रमाणे सांविधानिक बदल होणे गरजेचे आहे.

Standard

E Governance

ई-गव्हर्नन्स ः लोकाभिमुख प्रशासनाचे सूत्र

  • महेश झगडे, माजी सनदी अधिकारी

ई-गव्हर्नन्स हा शब्दप्रयोग अलीकडील काळात बराच चर्चेचा ठरला असला तरी प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजामध्ये त्याचा वापर आजही नगण्य स्वरुपाचा आहे. संगणकीकरणाचे युग अवतरल्यानंतर खासगी क्षेत्राने त्याचा वापर अत्यंत खुबीने करुन घेत आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. त्यातुलनेने प्रशासकीय यंत्रणा मात्र आजही मागासलेलीच आहे, असे म्हणावे लागेल. वस्तुतः, सरकारी कामकाजातील दिरंगाई, भ्रष्टाचार, गहाळपणा यांसारख्या जनतेला भेडसावणार्‍या सर्व समस्यांवर ई-गव्हर्नन्स हा रामबाण उपाय आहे. त्यासाठी कठोर इच्छाशक्ती दाखवल्यास मोठे परिवर्तन घडून येऊ शकते.

आपल्याकडे गर्व्हनन्स म्हणजेच शासन यंत्रणा कशी चालावी, त्यातील प्रक्रिया कशी पार पडली पाहिजे यासाठी काही मानके आहेत आणि त्या मानकांनुसार शासनयंत्रणा चालत असते. अनादी काळापासून ही व्यवस्था अस्तित्वात आहे. देशांची निर्मिती झाल्यानंतर त्यामध्ये कोणी काय काम करायचे, कर कसे वसूल करायचे, व्यवहार कसा करायचा याबाबतची व्यवस्था सुरू झाली आणि त्यातून प्रशासकीय यंत्रणा नावाची संकल्पना रुढ होत गेली. पुढील काळात जगभरात त्याला वैधानिक स्वरुप प्राप्त झाले. भारतात पूर्वीच्या काळी काही धार्मिक ग्रंथांमध्येही मानवी वर्तणुकीसंदर्भात काही सूत्रे दिलेली होती आणि त्यानुसार समाज चालत होता. त्यालाही एक प्रकारे प्रशासकीय कायद्यासारखेच स्वरुप होते. नंतरच्या काळात म्हणजे राजेशाहीमध्ये काही राजांनी चुकीच्या, तर काही राजांनी चांगल्या पद्धतीने कामे केली. केवळ कर गोळा करण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर केला. त्यामध्ये विकासाच्या संधींचा मोठ्या प्रमाणावर अभाव राहिला. केवळ नदीवर घाट बांधणे, मंदिरे-प्रार्थनास्थळे बांधणे एवढ्यापुरतीच त्यांची विकासाची संकल्पना मर्यादित राहिली. परंतु काही राजांचे प्रशासन हे आजच्या लोकशाहीला लाजवेल अशा स्वरुपाचे होते. यामध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. राजे म्हणून त्यांच्या हातात असलेली सर्व सत्ता त्यांनी जनतेला काय हवे आहे, प्रजेच्या समस्या काय आहेत यांचा विचार करुन त्यांनी प्रशासकीय व्यवस्था तयार केली. प्रशासनाचा कारभार करणार्‍या अधिकार्‍यांनी-कर्मचार्‍यांनी कसे वागावे, कसा लोकव्यवहार करावा याचे त्यांनी सूत्रबद्धतीने संहिताच तयार करुन दिली. त्यामुळे त्यांचे प्रशासन हे लोककल्याणकारी आणि लोकाभिमुख होते. ब्रिटिशांची राजवट येण्यापूर्वी आपल्याकडे आधी ईस्ट इंडिया कंपनी आली. या कंपनीने युरोपमध्ये किंवा पाश्चिमात्य जगात असणारी प्रशासकीय व्यवस्था भारतात आणली. त्यामागचा महत्त्वाचा उद्देश व्यापारकेंद्री आणि नफाकेंद्री होता. अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी सत्तेलासुद्धा आपण कह्यात घेतले पाहिजे, सत्तेवर अंकुश ठेवला पाहिजे या भूमिकेतून ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार सुरू झाला. ब्रिटिश सरकारनेही त्यांना सनद देऊन तशी परवानगी दिली. या प्रशासकीय व्यवस्थेतून फाईल नावाचा प्रकार आला. एखाद्या प्रस्तावावर निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा अधिकार कोणाचा असेल यांसारखी प्रक्रिया त्यातून सुरू झाली. गेल्या दोन-अडीचशे वर्षांपासून ती भारतात आजही कायम आहे. म्हणजेच आताच्या प्रशासकीय प्रणालीची बीजे ही प्रामुख्याने एका खासगी कंपनीने आणलेल्या व्यवस्थेत असून ती कालोघात विकसित होत गेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून राज्यकारभार सुरू झाला आणि प्रशासनाला, प्रशासकीय व्यवस्थेला, प्रक्रियेला कायद्याचे, नियमांचे कोंदण लाभले. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपल्याकडे असणारे अनेक कायदे हे मूलतः ब्रिटिशकालीन धारणांचे आहेत. त्या कायद्यांचा तत्कालीन उद्देश हा ब्रिटिशांना या देशात राज्य करता यावे, सर्वांवर अंकुश ठेवता यावा आणि ब्रिटिश साम्राज्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करुन घेता येईल हा होता. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या साडे सात दशकांत आपण त्यात आमूलाग्र बदल केले आहेत. या बदलांचा केंद्रबिंदू प्रशासन लोकशाहीभिमुख कसे असेल, लोकांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील हा राहिला आणि सर्व राजकारणी व प्रशासनातील नेतृत्वाचाही तो प्राधान्यबिंदू राहिला.
आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची स्थित्यंतरे होत असतानाच जगामध्ये तीन महत्त्वाची स्थित्यंतरे झाली. एक म्हणजे 1776 मध्ये झालेली औद्योगिक क्रांती आणि त्यातून झालेला भांडवलशाहीचा उगम व जगभरात झालेला त्याचा प्रसार. दुसरे म्हणजे 1840 ते 1860 या काळात झालेली दुसरी औद्योगिक क्रांती. या क्रांतीमुळे वीजेचा वापर वाढत गेला, उत्पादनाची प्रक्रिया प्रचंड गतिमान बनली आणि खर्‍या अर्थाने औद्योगिकरण सुरू झाले. तिसरे स्थित्यंतर म्हणजे 1960 मध्ये झालेली माहिती-तंत्रज्ञान क्रांती. या क्रांतीचा पाया संगणक होता. जगभरात वेगाने संगणकीकरणाचे वारे वाहू लागले आणि प्रशासकीय व्यवस्थाही त्याबरोबर बदलत गेली. 1980-90 च्या दशकापर्यंत भारतीय प्रशासकीय व्यवस्था संगणकांअभावी पूर्ण वेगळी होती. ती कागदाच्या वापरावर आधारलेली होती. 1990 च्या दशकात संगणकयुग आल्यानंतर सॉफ्टवेअर्सचा काळ सुरू झाला. याचे फायदे खासगी व्यवस्थेला होते तसेच शासकीय व्यवस्थेसाठीही हे परिवर्तन फायद्याचे होते.
असे असले तरी खासगी क्षेत्रात संगणकांचा किंवा माहिती-तंत्रज्ञानाचा वापर जितक्या वेगाने, व्यापकपणे आणि प्रभावीपणे होत आहे तितका शासन प्रणालीमध्ये आजही होत नाहीये. त्यामुळे तिसर्‍या क्रांतीचा पूर्ण लाभ घेण्यामध्ये आपले प्रशासन आजही खासगी क्षेत्राच्या तुलनेने पूर्णपणे तोकडे पडले आहे, हे वास्तव आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये ई-गव्हर्नन्स हा शब्दप्रयोग आपण सर्वच जण ऐकतो आहोत. ई-गव्हर्नन्स आणि ई-गव्हर्नमेंट यामध्ये फरक आहे. ई-गव्हर्नमेंटमध्ये संपूर्ण शासन व्यवस्थेची संरचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाते. उदाहरणार्थ, इस्टोनिया या देशाने भौगोलिक नागरिकत्वाप्रमाणे ई-रेसिडेंट म्हणजे सायबर स्पेसमधील नागरिकत्वाची संकल्पना अमलात आणली आहे. तो ई-गव्हर्नमेंटचा भाग आहे. आपण प्रस्तुत लेखात ई-गव्हर्नन्सचा विचार करणार आहोत. माहिती-तंत्रज्ञान, संगणक प्रणाली, स्मार्टफोन, टॅब्लेट इत्यादींचा वापर करुन शासनाला ज्या सेवा नागरिकांना – व्यावसायिकांना द्यावयाच्या आहेत, यंत्रणेकडून जी कामे करुन घ्यावयाची आहेत या सर्व इकोसिस्टीमचे परिचालन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणे म्हणजे ई-गव्हर्नन्स असे मानले जाते. यामध्ये तीन प्रमुख प्रकार येतात.
1) शासन ते नागरीक 2) शासन ते व्यावसायिक 3) शासन ते प्रशासकीय यंत्रणा.
ई-गव्हर्नन्सचे फायदे समजून घेण्यापूर्वी त्याची गरज काय आहे, याचा विचार करुया. आपल्याकडे खासगी क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत खुबीने करुन घेत आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. त्यादृष्टीने शासन प्रणालीत काय स्थिती दिसते?
लोकशाहीमध्ये नागरीक हा सार्वभौम असल्यामुळे तो राजा मानला जातो. परंतु ही गोष्ट केवळ बोलण्यापुरतीच मर्यादित राहते. कारण नागरिकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधांशी संबंधित दस्तावेजांसाठी, कागदपत्रांसाठी, नोंदींसाठी, व्यवहारांसाठी शासन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शासन देणारे आणि नागरीक घेणारे अशा प्रकारचे स्वरुप या रचनेला आले आहे. जगभरात ही स्थिती दिसते. तत्वतः ती चुकीची आहे. कारण नागरीक हा राजा असेल तर तो शासनावर अवलंबून असता कामा नये. त्यादृष्टीने नागरीक हाच शासन आहे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे आणि नागरिकांचे शासनावरील अवलंबित्व कमी करण्याचे सामर्थ्य किंवा क्षमता ईगव्हर्नन्समध्ये आहे.
वेगवान सेवा ः जगभराबरोबरच भारतातही शासकीय कामांसाठी होणार्‍या विलंबाबाबत नागरिकांच्या तक्रारी असतात. एखाद्या कागदासाठी, छोट्याशा परवान्यासाठी विविध कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. अधिकार्‍यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यामध्ये बराच काळ खर्ची होत असतो. हा कालापव्यय आणि त्रास कमी करण्यासाठी ‘स्पीड मनी’ किंवा ‘लाच’ देण्याची कुप्रथा सुरू झाली. या कुप्रथेवर घाव घालण्याचे काम ई-गर्व्हनन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होते आणि नागरिकांना जलद गतीने, घरबसल्या, जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही बसून शासकीय सेवा मिळू शकतात.
पारदर्शकता ः पारदर्शकता हा शासकीय कारभाराचाच नव्हे तर लोकशाहीचा आत्मा आहे. त्यादृष्टीने नागरिकांना सरकार दरबारी असणार्‍या आपल्या कामाची नेमकी स्थिती काय आहे, त्याबाबतची प्रक्रिया कुठे रखडली आहे, त्यात काय त्रुटी राहिल्या आहेत, कायदेशीर अडचण आहे का या सर्व बाबी समजण्यासाठी ई-गर्व्हनन्स प्रभावी ठरते. किंबहुना, ई-गव्हर्नन्सचा कार्यक्षमपणाने वापर जिथे केला जातो तिथे भ्रष्टाचार निश्चितपणाने कमी झालेला दिसून आलेला आहे. त्यामुळे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन ही संकल्पना प्रत्यक्षात अवतरण्यासाठी ई- गर्व्हनन्स अत्यंत मोलाचे ठरते.
खर्चात कपात ः शासकीय यंत्रणेचा पसारा मोठा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचा जवळपास 50 ते 60 टक्के खर्च हा कार्यालयीन व्यवस्थापनावर होतो. यामध्ये कर्मचार्‍यांचे वेतन, कार्यालयीन देखभालीचा खर्च, वाहतूक आदी गोष्टींचा समावेश असतो. हा खर्च ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. नागरिकांकडून कररुपातून गोळा होणार्‍या पैशांची ही एक प्रकारे बचतच म्हणावी लागेल. आजघडीला कार्यालयीन व्यवस्थापन खर्च, कर्मचार्‍यांचे वेतन यांसाठी होणार्‍या प्रचंड खर्चामुळे शासनाकडे कल्याणकारी योजनांसाठी कमी पैसा शिल्लक राहतो. ही अडचण ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून दूर होऊ शकते.
स्वातंत्र्यानंतर सात दशके उलटूनही शासकीय कार्यालयांमध्ये आज कागदांचे गठ्ठे, फाईल्स यांची जंत्री दिसते. वर्षानुवर्षाच्या नोंदींच्या साठवलेल्या हजारो-लाखो फाईल्सचे ढीग सरकारी दफ्तरांमध्ये आढळतात आणि जुन्या नोंदी शोधण्यासाठी बरीच यातायात सरकारी कर्मचार्‍यांना करावी लागते. ई-गव्हर्नन्समध्ये डिजिटल स्वरुपात नोंदी करण्याबरोबरच झालेल्या नोंदी साठवण्यासाठी ऑटोमेटिक स्टोअरेज सिस्टीम असते. त्यामुळे आपल्याला हव्या त्या क्षणी विनासायास कुठलीही नोंद उपलब्ध होऊ शकते. तसेच त्याचे विश्लेषणही त्वरित करता येऊ शकते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ई-गर्व्हनन्समध्ये सुरक्षितता खूप आहे. कागदी दस्तावेजांच्या फाईल गहाळ होण्याची, त्यामध्ये फेरफार होण्याची शक्यता असते. ई-गव्हर्नन्समध्ये प्रत्येक फाईल्सचा ऑटोमॅटिक बॅकअप घेतला जात असल्यामुळे गहाळ होण्याची शक्यताही नसते. तसेच फेरफारही करता येऊ शकत नाही.
ई-गव्हर्नन्सचे हे सर्व फायदे असले तरी राज्यांनी आणि देशाने – खासगी क्षेत्राच्या तुलनेने – त्याचा कितपत फायदा घेतला आहे, याची चर्चा होणे गरजेचे आहे. किंबहुना, त्याबाबत एक व्यापक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे तंत्रज्ञानाची वानवा नाही. पुणे येथील हिंजवडी व खराडी, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद आदी ठिकाणांवरुन आपण आयटी सॉफ्टवेअर्सची निर्यात करत असतो. आज जगभरातल्या अनेक दिग्गज-बहुराष्ट्रीय कंपन्यांची बॅक ऑफिसेस भारतात- महाराष्ट्रात आहेत. सिलीकॉन व्हॅलीमध्येही भारताचे खूप मोठे योगदान आहे. असे असूनही त्याचा शासन प्रणालीमध्ये सक्षमपणाने वापर केला जात नाही. याबाबत राजकीय व्यवस्थेला दोष देऊन चालणार नाही. कारण ती व्यवस्था दर पाच वर्षांनी बदलण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार सरकारे येत असतात- जात असतात. दुसरी गोष्ट म्हणजे, राजकीय नेत्यांना प्रशासकीय कामकाजाबाबत औपचारिक प्रशिक्षण दिलेले नसते. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञानाच्या वापराबाबतच नव्हे तर एकंदर प्रशासकीय कामकाजातील सुधारणांबाबतची जबाबदारी ही प्रशासन व्यवस्थेवर आणि विशेषतः त्यातील शीर्षस्थ नेतृत्त्वावर येऊन पडते. आयएएएस, आयपीएस, आयएफएस या सेवांमधून उत्तीर्ण होऊन प्रशासनात येणार्‍या अधिकार्‍यांनी खासगी क्षेत्राप्रमाणे माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेत सरकारी कामकाजाची कार्यपद्धती ही अधिकाधिक लोकाभिमुख कशी बनवता येईल हे पाहिले पाहिजे. दुर्दैवाने, याबाबत फारशी पावले टाकली गेलेली नाहीत, असे खेदाने म्हणावे लागते. उदाहरणार्थ, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची खासगी क्षेत्राची गाडी 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर सरकारी गाडी 10 ते 15 किलोमीटर वेगाने धावते आहे. इतकी मोठी दरी यामध्ये आहे. माझ्या 35 वर्षांच्या प्रशासनातील अनुभवातून ही दरी कमी होण्यासाठी काही उपाय मांडणे औचित्याचे ठरेल.
1) सद्यस्थितीत ई-गव्हर्नन्समध्ये कर्मचारी, अधिकारी सरकारी सॉफ्टवेअरचा वापर करण्यासाठी एका विशिष्ट लॉग-इन आयडीचा वापर करतात आणि पुढील प्रक्रिया पार पाडतात. माझ्या मते, ही प्रक्रिया उलटी असायला हवी. कर्मचार्‍याने सॉफ्टवेअर चालवण्यापेक्षा सॉफ्टवेअरने कर्मचारी किंवा यंत्रणा चालवली पाहिजे. सॉफ्टवेअर हे अद्ययावत आणि परिपूर्ण असले पाहिजे आणि त्याने संपूर्ण प्रशासन प्रणालीचे नियंत्रण केले पाहिजे. असे सॉफ्टवेअर तयार करणे शक्य आहे. पण तसे होत नाही. याचे कारण, अशा प्रकारची नवी प्रणाली स्वीकारण्याची मानसिकता प्रशासनामध्ये नसते. याचे कारण या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ‘ मी देणारा’ हा त्यांचा अधिकार हिरावून घेतला जातो. त्यामुळे आज बहुतांश सरकारी सॉफ्टवेअर्स पाहिल्यास ते यंत्रणांवरच अवलंबून असणारे आहेत. हा मुलभूत फरक दूर होत नाही तोपर्यंत ई-गव्हर्नन्सची आधुनिक प्रणाली ही प्रशासनासाठी एखाद्या खेळण्यासारखी राहील.
दुसरी गोष्ट म्हणजे, कोणत्याही सेवेसाठीचे सॉफ्टवेअर बनवून घेताना ते कशा प्रकारचे असायला हवे, त्यात कोणकोणत्या गोष्टी असाव्यात हे सर्व सांगणारे लोक प्रशासनातलेच आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सॉफ्टवेअर डेव्हलपर प्रोग्रॅमिंग करत असात. हा कंटेंट देताना प्रशासनातील कर्मचारी-अधिकारी हातचे राखून माहिती देतात. साहजिकच, अशा सॉफ्टवेअर्समुळे खर्‍या अर्थाने जो लाभ मिळणे अपेक्षित असतो तो मिळू शकत नाही. परिणामी ई-गव्हर्नन्स प्रणाली राबवूनही शासकीय कामकाज हे कर्मचारी-अधिकारी यांच्यावर अवलंबूनच राहते. तंत्रज्ञान हे त्यांच्या हातचे बाहुले बनून राहते. सुरुवातीला सांगितलेल्या सहा गोष्टींची पूर्तता करणारी सॉफ्टवेअर्स यंत्रणेत येतच नाहीत. एकविसाव्या शतकातील दोन दशके पार करून तिसर्‍या दशकात जात असताना यामध्ये बदल व्हायला हवा तरच त्याचा फायदा राज्याला, देशाला आणि नागरिकांना होऊ शकेल.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ई-गर्व्हनन्सचा मूळ उद्देश सफल होण्यासाठी जास्तीत जास्त सेवा आणि कमीत कमी शासकीय यंत्रणा अशी रचना आकाराला आली पाहिजे. विद्यमान केंद्र सरकारनेही ‘मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स’ हेच सूत्र अवलंबले आहे. ही संकल्पना किंवा उद्दिष्ट प्रत्यक्षात येण्यासाठी काही बदल करावे लागतील. यातील एक प्रमुख बदल म्हणजे काही अनावश्यक सेवा किंवा नियम बदलणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, अधिवासाचा दाखला किंवा रेसिडन्स सर्टिफिकेट. सरकारकडे नागरिकांच्या रहिवासाविषयीच्या अनेक प्रकारच्या नोंदी असतात. त्यामुळे सरकारनेच अशा प्रकारच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे सांगितले पाहिजे. अशा अनेक सेवांबाबत सूक्ष्मपणाने विचार करायला हवा आणि गरज नसलेल्या सेवांचे नियम काढून टाकले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे, एखादी सेवा नागरिकांना देण्याची गरज भासेल तेव्हा त्याला परवानगी देणारी किंवा अ‍ॅप्रूव्हल देणारी शासकीय अधिकारी व्यक्ती असता कामा नये. मशिनने किंवा प्रोग्रॅमने, सॉफ्टवेअरनेच नियमांचे सर्व निकष लावून, पडताळून त्याला परवानगी दिली पाहिजे. हे शक्य आहे. उदाहरणच घ्यायचे झाल्यास रेल्वेसाठीची तिकिटे काढण्यासाठी रांगाच रांगा लागायच्या. आता रेल्वे तिकिट ऑनलाईन काढता येणे शक्य झाले असून ते देताना कोणी व्यक्ती त्याबाबतचे अ‍ॅप्रूव्हल देत नाही. ही सर्व प्रक्रिया सॉफ्टवेअरकडूनच पार पाडली जाते. विमानांच्या तिकिटांबाबतही तसेच आहे. अशा प्रकारे सर्वच सेवांबाबत ऑटोमेशन सुरू झाले तर त्यातून अडवणुकीचे प्रकार शून्यावर येऊ शकते आणि त्यातून भ्रष्टाचारालाही थारा राहणार नाही. हे शक्य आहे का? याचे उत्तर निश्चितच हो असे आहे. परंतु शासकीय प्रक्रिया ही खूप क्लिष्ट असते, गुंतागुंतीच असते अशा सबबी देऊन याबाबत साशंकता निर्माण केली जाते. वास्तविक, ही क्लिष्टता मुळातच स्वतःच्या गैरफायद्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तयार केलेली असते. त्यामुळे या वैचारिकतेत, मानसिकतेत बदल झाला पाहिजे. यासाठी जनतेचा रेटा गरजेचा आहे. आज तंत्रज्ञानाने इतकी प्रचंड प्रगती केली आहे की अक्षरशः स्वप्नवत वाटणार्‍या गोष्टी प्रत्यक्षात घडताना दिसून येताहेत. त्यामुळे क्लिष्टता, गुंतागुंत या सर्वांवर तंत्रज्ञानाचा वापर हा प्रभावी ठरत आहे. मला याबाबत इस्टोनिया या देशातील आयकराचे उदाहरण सांगावेसे वाटते. या देशात इन्कम टॅक्स किंवा आयकराचा भरण्यासाठी नागरिकांना कसल्याही नोंदी जमवाव्या लागत नाहीत किंवा सनदी लेखापालाकडे, करसल्लागाराकडे जावे लागत नाही, कसलाही फॉर्म भरावा लागत नाही. आर्थिक वर्ष संपल्याच्या दुसर्‍या दिवशी तेथील नागरिकांच्या स्मार्टफोनवर सरकारकडूनच मेसेज येतो आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचे उत्पन्न, वजावट, करसवलत, बचत, ठेवी, कर्ज किती आहे याचे विवरण पाठवले जाते आणि ते तपासून संमतीचे बटण दाबा आम्ही तो बँकेतून वर्ग करुन घेतो असे सांगितले जाते. तेथील सर्व व्यवहार ऑनलाईन असल्यामुळे सरकारकडे प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद असते. वर्षभरातील त्या सर्व नोंदी एकत्रित करुन सॉफ्टवेअरकडूनच आयकराचे विवरण तयार केले जाते. इतका सुलभपणा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आला पाहिजे.
आणखी एक उदाहरण. मी पीएमआरडीएमध्ये आलो तेव्हा राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पंढरपूरमध्ये एका व्याख्यानामध्ये असे सांगितले की, बांधकाम परवानगीमध्ये प्रति चौरस मीटर 5 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत लाच स्वीकारली जाते. खरे तर ही गोष्ट उघडगुपित आहे. पण त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत आम्ही आमच्या हद्दीतील सुमारे 7000 चौरस किलोमीटरचे क्षेत्र विमानाने मॅप केले. प्रत्येकाच्या मालकीच्या क्षेत्राचे मॅपिंग केले. त्याचा सर्व्हे केला. मालकी हक्काची नोंद केली. त्यामुळे एखाद्या आर्किटेक्ट किंवा बांधकाम व्यावसायिक जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात बसून पीएमआरडीएच्या वेबसाईटला भेट देऊन त्याचा प्लॅन सादर करु शकतो. त्यानंतर त्यात काही त्रुटी-चुका असतील तर सॉफ्टवेअरच तसा संदेश त्याला देईल. त्या दुरुस्त करून प्लॅन सादर केल्यास पुन्हा तपासणी करुन सर्व नियमांत बसत असल्यास त्याला संमती दिली जाईल. अशी प्रणाली 2017 मध्ये पीएमआरडीएमध्ये आम्ही विकसित करुन तयार केली होती. सांगण्याचा मुद्दा म्हणजे, बांधकाम परवान्यासारखा क्लिष्ट नियमांचा समावेश असणारा दस्तावेजही ऑटोमेशनच्या साहाय्याने प्रशासकीय हस्तक्षेपाशिवाय देता येण्याची व्यवस्था बनली. दुर्दैवाने, शासकीय यंत्रणेने त्याचा वापर होऊ दिला नाही. आपल्याकडे खूप मोठा गाजावाजा करुन सातबार्‍याचे संगणकीकरण योजना आणली गेली. त्याचा प्रचार-प्रसारही बराच झाला. शेकडो कोटी रुपये त्यावर खर्ची झाले. परंतु तो ई-गव्हर्नन्स प्रोजेक्ट नाहीये. तो केवळ संगणकीकरणाचा प्रकार आहे. 2003 मध्ये मी नाशिकचा जिल्हाधिकारी असताना यासंदर्भात एक सूचना केली होती. त्यानुसार प्रत्येक एकराचे किंवा त्याच्या मालकी हक्काचे शेअर सर्टिफिकेट तयार करण्याचा प्रस्ताव मी दिला होता. त्यानुसार एखादी चलनी नोट जशी दुसर्‍याकडे दिली की त्याच्या मालकीची होते तशाच प्रकारे हा शेअर हस्तांतरीत होईल. त्यातून जमीनीच्या व्यवहारात प्रचंड सुलभता आली असती. जमीनीचे वादप्रवाद, दावे कमी झाले असते. मुख्य म्हणजे या सर्वांतील भ्रष्टाचाराला आळा बसला असता. पण त्याचा विचार केला गेला नाही.
शेवटचा मुद्दा म्हणजे, चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये ई-गर्व्हनन्समध्ये प्रचंड मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. आर्टिफिशल इंटेजिलन्स, रोबोटिक्स, जिनॉमिक्स, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, ऑटोमेशन या सर्वांचा सक्षमपणाने वापर केल्यास प्रशासकीय कार्यपद्धतीचा कायापालट होऊ शकतो. विशेषतः ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर शासकीय यंत्रणेत प्रभावीपणाने करता येईल. या सर्व गोष्टी दहा वर्षांपासून अस्तित्वात आहेत; पण प्रशासनात त्याचा वापर केला गेला नाही. संगणकीकरण, ईगव्हर्नन्सच्याबाबत खासगी क्षेत्र एकविसाव्या शतकात असेल तर तुलनेने प्रशासन सोळाव्या-सतराव्या शतकात आहे. यामध्ये बदल करायचा असेल, लोकशाही निकोप करायची असेल, भ्रष्टाचाराचे उच्चाटन करायचे असेल तर प्रशासकीय प्रणालीमध्ये जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. तरच प्रशासन लोकाभिमुख होईल. येणार्‍या काळात ई-गव्हर्नन्सबाबत ‘लायन लीप’ घेतली जाईल अशी अपेक्षा बाळगूया.

Standard

The larger context of agrarian issues & a plausible solution.

The existing impasse around the farmers’ protest against the farm laws continues in spite of the intervention by the Supreme Court. I’m not going to comment about the merits or demerits of the new farm laws or the issues involved. However, let’s try to understand it from the broader perspective of the whole economic ecosystem.

The agriculture had been the dominant sector of the planetary economy since the dawn of the civilisation until its supremacy was replaced by the first three Industrial Revolution beginning two hundred and fifty years ago. The Industrial Revolutions were also accompanied by the emergence of capitalism and a market economy. The three Industrial Revolutions created huge job opportunities and helped assimilation agrarian workforce into secondary and tertiary segments of economy, however, even today, according to the estimates of the FAO, about sixty per cent of global population is still dependent, directly or indirectly, upon agriculture and yet its contribution to the world GDP is just about 4%, a dismal figure in comparison to the combined contribution of 90% of the secondary & tertiary sectors of economy. The agricultural produce at the primary level is disproportionately insignificant given the size of the population that it is required to sustain. The Indian scenario isn’t much different, except that the GDP contribution of this sector (12-15%) to the econom, is somewhat higher than the world average. This is s. Case of sectoral income inequalities.

To minimize dependency of the vast population on agriculture, the only plausible and time tested solution adopted was to shift it to industry and services sectors. This was facilitated by the creation of a very large workforce in technology driven sectors during the earlier three Industrial Revolutions, however, now, the tables are appearing to be turning around as some of the reports indicate that there will be net job losses during the regime of the Fourth Industrial Revolution due to artificial intelligence, robotics, cognitive analytics, 3D printing, genomics and, overall, due to a range of new technologies that are fusing the physical, digital and biological worlds, impacting all disciplines of life, economies and industries, and even challenging ideas about what it means to be human. And, therefore, the doors that were historically open during the last two centuries are closing down to assimilate the huge population from agriculture.

On this backdrop, it has become imperative to rethink of economic order to contain the unrest, turmoils and conflicts as the majority of the population getting restive due to scarcities of opportunities to earn a livelihood especially from the sector of agriculture. The Central and the State Governments are continuously trying to improve the economic status of farmers, however, these efforts do not get translated into a sustainable increase in the per capita income of the farmers.

Instead of addressing the problem faced by the farmers alone, there is a need to take a comprehensive view for a new economic model on the backdrop of the highly distorted economic inequality, subjugation of technology by the secondary and tertiary sectors, impending large scale job losses sealing opportunity for shifting people from agriculture to other sectors. The country needs to adopt pragmatic, disruptively innovative fresh thinking commensurate with the currency of the time. From this perspective, many new innovative models could be designed.

I am proposing one such solution that could be employed to address the issues haunting agrarian economy and pave way for retention of population in the agriculture sector by bringing rural average household income closer to that are engaged in manufacturing and services sectors without making any reference to the farmers’ agitation, or the new farm laws, continuance or abolition of APMCs, MSP, DBT, subsidies etc. I am proposing it as an independent initiative notwithstanding any of the above mentioned issues.

The proposal is simple, however, it would require deployment of digital technologies that are being used commercially on a large scale and; it wouldn’t be an impediment as the country is blessed with the availability of such technologies.

My proposal involves fixation of prices of all the agricultural primary goods on a day to day basis or periodically by the local farming community. Once such prices are discovered and fixed the first trade will have to procure that commodity at a price not below the price so fixed. The subsequent sales or trades can happen depending on the market forces. I propose to suggest a name to this scheme as

“First Trade Minimum Price” (FTMP).

The exercise of fixation of prices could be enabled through the use of robust digital technologies that are easily available. The organisational structure, statutory/regulatory mechanisms, the use of technologies are the aspects of detailing and are not at all difficult to conceptualise and implement. As the proposal is extremely simple, it wouldn’t take a long gestation period to operationalise it. It also doesn’t take away anything that is currently available to the farmer and, hence, I do not apprehend any resistance from them or for that matter from any other quarter.

This proposition is perfectly aligned with the existing accepted and unquestionable practices. It’s a fact that the GDP contribution of the secondary and tertiary sectors combined together is more than ~80% and it’s also a fact that the prices of products or the services of this ~80% economy are determined and decided by the manufacturers of the products or the service providers. My proposition is to enable the farming community also to decide the prices of their products like the secondary and tertiary segments of the economy.

The country and the Government may consider this suggestion to address the issue from all the dimensions and with an eye on the future of the economic well-being of the masses.

Mahesh Zagade(xIAS)

Former Principal Secretary to

Govt of Maharashtra.

( Published in Indian Express earlier)

Standard

The Indian who made J&J stop baby(Times of India)

powder sales | India News –

Last week pharma behemoth Johnson & Johnson (J&J) announced that it would

discontinue the sale of its talc-based baby powder globally from 2023. The

company faces thousands of lawsuits from women who have alleged that the

talc contains asbestos and causes cancer.

The company said that it had made a “commercial decision” to transition to a

cornstarch-based baby powder.

There is an Indian ‘push’ to J&J’s decision to discontinue the manufacture and

sale of its talc-based baby powder. Eight years ago, India was the first country

that raised concerns over J&J baby talc powder being sterilised by ethylene

oxide, a known carcinogenic.

While ethylene oxide can be used for sterilisation, the company did not bother to

carry out tests to check the amount of residue in the product.

The man who took on the pharma giant was Mahesh Zagade, then the

commissioner of Maharashtra’s Food and Drug Administration (FDA).

On August 12 he tweeted, “I was the first in the world to cancel manufacturing

licence of JnJ’s baby powder for their criminality of usage of carcinogenic

material. This was done 8 years ago.”

In the cross hairs

Zagade, who had joined the FDA in August 2011, started off with a crackdown on

major pharmaceutical companies, besides chemists and pharmacists functioning

illegally. However, the action against the giant pharmaceutical company J&J

reverberated globally and a team of the USFDA flew down to Mumbai to

investigate matters resulting in a big setback to the company.

In an exclusive interview to TOI+, Zagade, a former Indian Administrative Service

(IAS) officer says that cancelling a licence of a giant pharma company was not

easy and he had to face immense pressure from his superiors to politicians, from

being offered bribes to being threatened.

“At the end of the day, what matters is the safety of the people. Playing with

human lives is totally unacceptable,” he says. Recalling the events leading up to

the cancellation of J&J’s licence, Zagade, who took over as FDA commissioner in

August 2011, says that as he was new to the job, he was going through various

complaints and reports. “I came across a report on Johnson and Johnson. My

officers told me that it dated back to 2007 when they found that 15 batches

which included 1,60,000 bottles of Johnson & Johnson baby powder were

sterilised by ethylene oxide, a known carcinogenic and irritant.”

According to the report, the particular batches were outsourced to a company in

Thane for sterilisation. The Thane company sterilised with ethylene oxide for

which the standard operating process was not submitted to FDA. Before sending

it to Thane, J&J should have taken the permission of FDA which they had not

taken, he says.

Cracking down

“Ethylene oxide is used in hospitals to sterilise equipment. There was no reason

why the J&J had used such a strong chemical to sterilise baby powder boxes. I

was shocked that no action had been taken despite knowing the facts. While

investigating we found that J&J continued sending the batches to the Thane firm

for sterilisation,” says Zagade.

He decided to probe the matter and spoke to experts who told him that if

children are exposed to ethylene oxide then chances of them getting cancer is

high. “I was convinced that it was a serious matter and we couldn’t sweep it

under the carpet. So in April 2013 I asked the joint commissioner to cancel the

licence of J&J’s Mulund plant,” he says.

It wasn’t a simple matter, Zagade recalls. The order had to properly drafted after

taking advice from lawyers because J&J would surely move the courts. It was

probably the first time that the FDA was cancelling the licence of a large

multinational company.

“After serving the notice to shut down the Mulund plant, the same day I went to

meet FDA minister Manohar Naik to explain to him the seriousness of the matter

and our action. The company, as we had predicted, approached the minister.

However, he was not moved, he recalls.

“I cannot explain the kind of pressure I had to deal with, but I was adamant and

firm on my decision. I must have received at least 10 [phone] calls every day

asking me to rescind the notice. I explained to everyone the seriousness of the

issue and a company like Johnson and Johnson can not play with the lives of its

customers,” he says.

J&J finally moved the court and started legal proceedings.

Order, order

In September 2013 the court agreed that a carcinogenic substance was used but

since the plant was already shut for 90 days and production had stopped, the

FDA was asked to issue a fresh notice.

“I was directed to change my affidavit and in the meantime the plant could

restart. Since it was a court order, my hands were tied. In August 2014 I was

transferred. There was a lot of pressure to transfer me from various quarters,

including industry bodies. However, the best thing was the news about J&J had

spread globally and the USFDA and other concerned authorities contacted me to

understand the gravity of the situation,” says Zagade.

“During my tenure I wanted the Maharashtra FDA to emerge as a department

that cares for the people, guards them from unscrupulous elements. Public good

must prevail over private interests,” he says.

During his tenure as the chief of FDA, Zagade was also instrumental in banning

gutka and pan masala in Maharashtra. Also he took action against errant

chemists operating without pharmacists, or selling medicines without prescriptions; he played a major role in cracking down on internet pharmacy rackets, and exposed the illegal trade of addictive prescription drugs. His insistence on following the rule book was termed “administrative terrorism” by his colleagues.

Standard

“व्यावसायिक मूल्यांना ‘पावडर’ फासणाऱ्या कंपनीविरोधातील एक लढा!”(रविवार लोकसत्ता)

———————————————————————————————————————————

जॉन्सन अँड जॉन: या कंपनीने जॉन्सन बेबी पावडर हे आपले उत्पादन बंद करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. स्त्रियांना तसेच बालकांना कर्करोगाच्या तोंडी घडणारे हे उत्पादन, सरकारी बाबूंना हाताशी धरून जनतेच्या माथी लादणाऱ्या या कंपनीला सरकारी व्यवस्थेतूनच दिल्या गेलेल्या आव्हानाची ही गोष्ट. ‘एक पत्थर तो तबीयतसे उच्छालो यारो’ हेच सांगते.

——————————————————————————————————————————-

महेश झगडे

सुमारे ५२.१ बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त वार्षिक विक्री असलेल्या जगातील चौथ्या क्रमांकावरिल महाबलाढ्य जॉन्सन अँड जॉन्सन या बहुराष्ट्रीय कंपनीने त्यांचा सन १८९४ पासून बाजारात आणलेला व घराघरात पोहोचलेला जगप्रसिद्ध जॉन्सन बेबी पावडर हा मोठा ब्रँड बाजारातून २०२३ पासून मागे घेण्याचा निर्णय दिनांक 11 ऑगस्ट रोजी जाहीर केला. असे असले तरी या पावडरची विक्री अमेरिका आणि कॅनडा मध्ये दोन वर्षापूर्वीच थांबलेली आहे.

ब्रँड बाजारातून मग घेण्याचा जो निर्णय कंपनीने घेतला आहे त्याची अधिकृत कारणे देतांना कमानीने असे सांगितले आहे की हा निर्णय बदलती बाजारव्यवस्था आणि ग्राहकांच्या बदललेल्या पसंती यामुळे घेण्यात आला आहे. अर्थात वस्तुस्थिती वेगळी आहे. जॉन्सन बेबी पावडर हि टॅल्कम पावडर असून ती टॅल्क हे खनिज वापरून तयार केलेली पावडर आहे. मूलतः टॅल्कमध्ये आणि त्यापासून तयार होणाऱ्या बेबी पावडरमध्ये ऍसबेसटॉसचे कण असल्यामुळे त्यापासून वापरकर्त्यांना व विशेषतः स्त्रियांना जननेंद्रियांचा कर्करोग होतो अशा तक्रारी होत्या. ऍसबेसटॉसमुळे कर्करोग होतो हे शास्त्रीयदृष्ट्या मान्य करण्यात आलेले आहे, तसेच या पावडर मध्ये त्याचे कण असतात हेही सिद्ध झालेले आहे. या पार्श्वभूमीवर या पावडरचा वर्षानुवर्षे वापर केल्याने कॅन्सरला बळी पडावे लागले व त्यास कंपनी जबाबदार असल्याने कंपनीने नुकसान भरपाई द्यावी म्हणून अमेरिका आणि इतरत्र ग्राहकांनी न्यायालयाकडे धाव घेतली व त्यातील अनेक निवाड्याद्वारे न्यायालयाने हजारो कोटी रुपयांची नुकसान भरपाई रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांना कंपनीने देण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे बदलत्या बाजार स्वरूपामुळे कंपनीने ही टाल्क आधारित पावडर निर्माण व विक्री बंद करण्याचा निर्णय केला नसून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर निर्णय झाला ते अगदी सुस्पष्ट आहे. अर्थात केवळ नफा या एकाच उद्देशाने कार्यरत असलेल्या या बहुराष्ट्रीय कंपनीने हा ब्रँड कायमचा बंद केला नाही तर आता मक्याच्या पिठावर प्रक्रिया करून तशी पावडर बाजारात आणण्याचीही त्यांची व्यूहरचना आहे. म्हणजेच एका अर्थाने टॅल्कमध्ये ऍसबेसटॉस होते व मानवी जीवनस ते अपायकारक होते यावर कंपनीने अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केला आहे.

औषधे किंवा प्रसाधनांची बाजारपेठ मोठी आहे व त्यापासून मिळणारा नफाहि अवाढव्य आहे. ग्राहकांना ही उत्पादने खरोखरच गरजेचे आहेत किंवा नाही ह्याचे सोयरसुतक नसणे तर जाउद्याच पण त्यामुळे शारीरिक अपाय संभवत असले तरी जाहिराती आणि अन्य मार्गाने ती उत्पादने ग्राहकांच्या माथी मारण्याचे उद्योग अशा ‘उद्योगी’ कंपन्या पैशाच्या हव्यासापोटी करीत असतात. अर्थात अशा प्रसाधनांमुळे मानवी आरोग्यास धोका होऊ नये म्हणून सर्वच देशात भक्कम कायदे आहेत, तथापि अशा महाबलाढ्य बहू राष्ट्रीय कंपन्यापुढे या कायद्याची अंमलबजावणी निष्प्रभ ठरते आणि मग दशकानुदशके त्यांचा वापर झाल्यानंतर त्याबाबत कारवाई होते किंवा अनेक वेळेस तशी कारवाई कधीहि होत नाही हे विदारक सत्य आहे. अशा प्रकारची अनेक उदाहरणे माझ्या महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावरील कारकिर्दीत दृष्टोत्पत्तीस आले आणि त्याविरुद्ध भक्कम कारवाया देखील केल्या. त्यापैकी जॉन्सन बेबी पावडर विरोधात केलेली कारवाई ही आता या कंपनीने दिनांक 11 ऑगस्ट रोजी ही पावडर बंद करून नव्या स्वरूपात बदल करण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा त्या आठवणी ताज्या झाल्या.

ऑगस्ट 2018 मध्ये मला पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावरून तीन महिन्याच्या प्रशिक्षणस पाठविण्यात आले होते, तथापि, दरम्यानच बदली करून सुमारे तीन महिने नवीन पोस्टिंग दिलेली नव्हते व अचानकपणे आयुक्त अन्न व प्रशासनाच्या आयुक्त पदी पदस्थापना देण्यात आली. अर्थात तत्पूर्वी या खात्याबद्दल फारशी माहिती नव्हती. ती माहिती करून घेण्याच्या प्रयत्नात मी या खात्यात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेताना जॉन्सन बेबी पावडर च्या विरोधात एका तक्रारीचे प्रकरण समोर आले होते. तक्रारीनुसार जॉन्सन अंड जॉन्सन या कंपनीने सदर पावडरची निर्मिती करताना इथिलीन ऑक्साईड या केमिकल्सचा वापर केला होता व या पदार्थामुळे कर्करोग होऊ शकतो असे नमूद करून कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यावर मी मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही तक्रार प्रलंबित असण्याची कारणे विचारली असता त्यांच्या मते अशा तक्रारी नेहमीच येत असतात, त्यामध्ये तथ्य नसते , शिवाय इतक्या नामवंत आणि प्रचंड मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनी कडून अशा चुका म्हणजे गुन्हेगारी वृत्ती घडणे शक्यच नाही कारण जगामध्ये ती एक नावाजलेली कंपनी आहे. एकंदरीतच कंपनी नामांकित असल्याने त्या कंपनीविरुद्ध चौकशी करण्याचा प्रश्नच नाही असा त्यांचा सूर होता. त्यांच्या देहबोलीतून तर ते या कंपनीची पाठराखण करीत असल्याचे स्पष्ट जाणवत होते. अर्थात या स्पष्टीकरणामुळे साहजिकच माझे समाधान होऊ शकले नाही. मी संबंधित मूळ कागदपत्रे क्षेत्रीय म्हणजे मुंबई विभागीय कार्यालयातुन मागून तपासली आणि प्रकरण धसास लावण्यासाठी मुख्यालयातील एका सहाय्यक आयुक्तांच्या देखरेखीखाली चौकशी सुरू केली. ही चौकशी सुरू झाल्याचे एका वृत्तपत्राने एक लहान बातमी छापली. परिणामतः या कंपनीत पूर्वी वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने बेबी पावडरच्याबाबतीत कंपनीकडून कोणत्या अनियमितता झाल्या त्याची पूर्ण लेखी माहिती पाठविली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कार्यालयीन चौकशी होऊन त्याचा अहवाल माझ्याकडे आला. विशेष म्हणजे कार्यालयीन चौकशीतिल निष्कर्ष आणि कंपनीच्या अंतर्गत अधिकाऱ्याने पुरवलेली लेखी माहिती हे पूर्णपणे जुळत होते. एक आहे कि या चौकशीमधून जे निष्पन्न झाले ते प्रशासन आणि अशा निर्माता कंपन्या यांच्या लागेबांध्याचा विद्रुप चेहरा पूर्णपणे उघडा पडला.

या कंपनीच्या मुलुंड येथील कारखान्याला बेबी पावडर बनवण्याचे लायसन्स फार पूर्वी देण्यात आले होते. लायसन्स मिळवितांना पावडर निर्माण करण्याची पद्धती कंपनीने एफ डी ए ला सादर करणे वैधानिकरीत्या आवश्यक असते व त्याप्रमाणे त्यांनी ती पद्धत पूर्वीच सादर केलेली होती. त्या बरहुकूम ची पावडरची निर्मिती करणे कंपनीवर बंधनकारक होते आणि या प्रक्रियेत बदल करावयाचा झाला तर तो बदल कंपनीने पुन्हा सादर करणे बंधनकारक होते.

बेबी पावडरच्या या निर्मितीमध्ये टॅल्क हे खनिज वापरले जाते. अर्थात ही पावडर बनवताना हे टॅल्क आणि अंतिम उत्पादन जंतुरहित व्हावे म्हणून जंतू नष्ट करण्यासाठी वाफेचा वापर केला जाईल अशी प्रक्रिया पद्धती त्या कंपनीने एफडीआयला सादर केली होती. या पावडरच्या काही बॅचेस वाफेची प्रक्रिया वारंवार करूनही जंतुरहित होत नसल्याचे कंपनीच्या प्रयोगशाळेच्या लक्षात आलेहोते. वास्तविकत: तसे असले तर कंपनीने या बॅचेस ची पावडर निर्माण प्रक्रियेतून वगळली पाहिजे होती. पण कंपनीने निर्णय घेतला की या बॅचेस चे जंतुरहित करण्यासाठी ठाणे येथीलअन्य कंपनीवर जबाबदारी सोपविली. आणि त्यांनी त्या बॅचेस जंतुरहित करून घेतल्या व त्यापासून सुमारे दिड लाख पावडरच्या डब्यांची निर्मिती करून विक्री केली. हे करीत असताना त्यांनी मुळात पावडर जंतुविरहित करण्याची प्रक्रिया इतर कंपनीकडे करून घेण्यापूर्वी त्यासाठी एफ डी ए ची पूर्व मान्यता घेणे बंधनकारक होते व ती अनियमातता होती. पण त्यापेक्षाही भयंकर म्हणजे ठाणे येथील कंपनीने पावडर जंतुरहित करण्याच्या प्रक्रियेमध्ये वाफेऐवजी इथिलीन ऑक्साईड हा गॅस वापरला. हा गॅस औद्योगिक आणि इतर कारणासाठी वापरला जात असला तरी त्यामुळे कर्करोग होतो हे आंतरराष्ट्रीय कर्करोगावर संशोधन यंत्रणा(International Agency for Research on Cancer) या संस्थेने जाहीर केले आहे तसेच अनेक शोधनिबंधाद्वारे तसेच निष्कर्ष प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे कंपनीने या गॅसचा वापर करणे हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य होते. त्यापेक्षाही भयानक म्हणजे पावडरची अंतिम प्रक्रिया झाल्यानंतर त्यामध्ये इथिलिन ऑक्साईडची मात्र हा शिल्लक तर नाही ना याचीही प्रयोगशाळेत तपासणी केलेली नव्हती. केवळ पैसे कमावण्याच्या धुंदीत आंधळे झालेल्या या कंपनीने सुमारे दीड लाख भारतातीय बालके किंवा किंवा ग्राहकांना रक्ताचा कर्करोग, लिंफोमा अशा स्वरूपाच्या कर्करोगांच्या तोंडी दिले होते. सर्वात गंभीर बाब म्हणजे एफडीएचे अधिकारी जे कंपनीची वार्षिक तपासणी करतात त्यामध्ये या गॅसचा वापर कंपनीने दहा-पंधरा वर्षांपूर्वीही केला असल्याचे निष्पन्न झाले होते, पण त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष करून कंपनीस पाठीस घातल्याचेही दिसून आले. इतर आणखी अनियमितता होत्याच. कंपनीचे प्राबल्य विचारात घेऊन या बाबत कारणे दाखवा नोटीस अत्यंत काळजीपूर्वक तयार करून त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांवरकरवी ती कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि मग एकच गहजब झाला. नोटीसमध्ये स्पष्ट होते की सदर अवैध कृत्यामुळे त्यांचे लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये. सदर बाब माध्यमांनी उचलून धरली.

त्यानंतर मला अनेक फोन यायला लागले; त्यामध्ये माझे प्रशासकीय वरिष्ठ, राजकीय नेतृत्व, केंद्र शासनाचे अधिकारी इ चा समावेश होता. त्यांचे सर्वांचे म्हणणे एकच होते ती इतकी नामांकित कंपनी अशी चूक करूच शकत नाही. तशातच कंपनीचे प्रतिनिधीहि भेटून गेले आणि त्यांनी ही माझी कारवाई बेकायदेशीर असल्याने मी वैयक्तिकरित्या अडचण घेऊन मलाच मोठ्या कारवाईला तोंड द्यावे लागेल असा सज्जड इशाराही दिला. एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने मला आणि माझ्या अंतर्गत काम करणार्‍या अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यालयात पाचारण करून चांगलेच फैलावर घेऊन तुम्हाला काही समजते का? बहुराष्ट्रीय कंपन्यांना तुम्ही भारतातून पळून लावणार आहात का? त्यामुळे देशाचा रोजगार तुम्ही कमी करणार आहात का ? वगैरे वगैरे. त्यावर मी ठाम होतो की दीड लाख बालकांना कर्करोगाला सामोरे जाऊ लागावे असे कृत्य या कंपनीकडून घडल्याने कठोर कारवाई आवश्यकच आहे. त्यावर त्यांचे समाधान झाले नाही.

सुनावणी घेऊन कंपनीला नियमाप्रमाणे लेखी व तोंडी म्हणणे मांडण्याची संधी दिली. कंपनीला कारणे दाखवा नोटीसला उत्तर देतांना त्रेधातिरीपट उडाली होती हे स्पष्ट जाणवत होते कारण त्या अनियमिततेचे ते समर्पक समर्थन करूच शकत नव्हते. तरीही इथिलिन ऑक्साईड हा पदार्थ अजिबात धोकादायक नाही , आम्ही कोणतीही मोठी चूक केली नाही , गौण अनियमातेसाठी लायसन्स रद्द करण्यासारखी मोठी शिक्षा होणे गैर आहे इ त्यांच्याकडून बाजू मांडण्यात आली. सर्व बाजूंचा विचार करून संबंधित अधिकाऱ्याने मुलुंड येथील बेबी पावडर बनवण्याच्या कारखान्याचे लायसन्स रद्द केले. असे लायसन रद्द होण्याची हि पहिलीच कारवाई असावी आणि अशी कारवाई होऊ शकते हे त्या कंपनीच्या ध्यानीमनीही नसावे. कारण त्यांना आजपर्यंत कोणीही हात लावण्याचा प्रयत्न केलेला नव्हता असा त्यांचा कायमचा अविर्भाव होता. हे प्रकरण भारतातच नव्हे तर जगभर गाजले. त्यात अमेरिकेतील वार्ताहर, वकील आणि तेथील अधिकाऱ्यांचे फोन येऊ लागले व ही बातमी खरी आहे का याची चौकशी करू लागले.

कंपनीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे लायसन्स रद्द करण्याच्या आमच्या आदेशाविरुद्ध शासनाकडे म्हणजेच अन्न व औषध मंत्र्यांकडे अपील केले. सुदैवाने आम्ही आमचे म्हणणे मांडण्यास यशस्वी झालो व तत्कालीन मंत्री श्री मनोहर नाईक यांनी कंपनीचे अपील फेटाळून लावले. वास्तविकतः मंत्री हे या बाबतीत कंपनीच्या बाजूने निर्णय देतील असा आत्मविश्वास कंपनीला होता तो फोल ठरेल याची मी पुरेपूर काळजी घेतली होती. कंपनी लायसन्स रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. तीन महिन्यांनी हे प्रकरण सुनावणीस आले. सुनावणीदरम्यान खूपच मनस्ताप सहन करावा लागला आणि न्यायालयाने निर्णय दिला की कंपनीला पुन्हा एकदा करणे दाखवा नोटीस द्यावी व त्यांना पुन्हा एकदा त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी व तोपर्यंत कारखाना सुरू ठेवावा. तीन महिने कारखाना बंद झाल्यानंतर तो पुन्हा सुरू झाला.

अर्थात कंपनीला पुन्हा नोटीस देणे हे कंपनीच्या पथ्यावर किंवा त्यांच्या बाजूने निर्णय लागण्यासारखे होते. ह्याचे कारण म्हणजे मी तोपर्यंत माझा एफ डी ए तिल तीन वर्षाचा आयुक्त पदाचा कार्यकाल पूर्ण करत होतो व त्यांना माझ्या अनुपस्थितीत पुन्हा रान मोकळे होणार होते.

माझी बदली झाली. पुढे काहीहि झाल्याचे ऐकिवात नाही. देशातील आणि राज्यातील ग्राहक आणि रुग्ण यांच्या हितांचे खूपच चांगले कायदे आहेत, पण संघटित निर्माते आणि व्यापार संघटना यांच्याबरोबर साटेलोटे ठेवून या कायद्याची अंमलबजावणी देशातील शासकीय यंत्रणा करीत नाहीत हि वस्तुस्थिती आहे.

(लेखक माजी सनदी अधिकारी आहेत)

zmahesh@hotmail.com

Standard